शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

काटा काढण्यासाठी तडजोडीच तडजोडी

By admin | Updated: October 13, 2014 00:48 IST

‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या न्यायाने सगळीकडे तडजोडीच

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर आले असल्याने विरोधी उमेदवाराचा काटा काढण्यासाठी प्रत्येक मतदारसंघांत ‘सोयीच्या राजकारणा’ला ऊत आला आहे. ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या न्यायाने सगळीकडे तडजोडीच तडजोडी सुरू झाल्या आहेत. ज्यांनी आपले पत्ते आजपर्यंत खुले केले नव्हते, त्यांनी उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केल्याने कोण कुणाच्या बाजूने उभा राहणार हेदेखील स्पष्ट होऊ लागले आहे.‘कोल्हापूर उत्तर’मध्ये मुख्यत: कसबा बावड्यात आज दुपारपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते मोबाईलवर बोलतानाही ‘जय महाराष्ट्र’ म्हणून सुरुवात करीत होते. त्यामुळे ‘कोल्हापूर दक्षिण’च्या लढतीचे पडसाद या मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणी वाढविणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याबदल्यात ‘दक्षिण’मधील भगवा कार्यकर्ता हातात ‘हात’ घ्यायला तयार झाल्याची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीतील पैरा फेडायचा म्हणून महाडिक गटही एकाच मतदारसंघातील परस्परविरोधी दोन उमेदवारांना छुपा पाठिंबा देत असल्याचेही चित्र दिसते आहे. दुसरीकडे कालच एलबीटीच्या प्रश्नावरून व्यापाऱ्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये शिवसेनेला, तर ‘दक्षिण’मध्ये मात्र भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्या प्रश्नांसाठी लढणारा उमेदवार व प्रश्न सोडविणारा पक्ष म्हणून दोन ठिकाणी दोन वेगवेगळ््या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे संघटनेचे नेते सांगत आहेत.करवीर मतदारसंघात आजच्या दिवसांपर्यंत ‘जनसुराज्य’चा नारळ म्हणणारी राष्ट्रवादी काही गावांत अचानक ‘धनुष्यबाण की जय’ म्हणताना दिसत आहेत. मुख्यत: भोगावती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अशा कोलांटउड्या सुरू झाल्या आहेत. पक्षाच्या नेत्यांनी अशी भूमिका घेतल्याने नेत्यांना सोडून प्रमुख कार्यकर्ते परस्पर काँग्रेसला पाठिंबा देऊ लागले आहेत.‘राष्ट्रवादी’च्या करवीरमधील भूमिकेचे पडसाद शेजारच्या राधानगरी मतदारसंघात उमटण्याची चिन्हे आहेत. त्या मतदारसंघातील शेकापचा गट घड्याळ सोडून देऊन ‘शिवसेना की जय’ असे म्हणण्याच्या तयारीत आहे. मुळातच या मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात जोरदार लाट वाहत असून, सगळ््या मतदारसंघांत धनुष्यबाणाचे वारे वाहत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. (प्रतिनिधी)बहुतांश मतदारसंघांत शेवटच्या टप्प्यात दुरंगीच लढतीचे चित्र पुढे आल्याने रिंगणातील तिसऱ्या,चौथ्या क्रमांकावरील उमेदवाराच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी व्यूहरचना काम करू लागली आहे.