कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा विभागाचे मारूती शामराव जाधव (वय ४३, रा. कोलोली, ता. पन्हाळा) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांना २४ डिसेंबरला अपघात झाला होता. त्यांच्यावरील उपचारासाठी शिक्षक संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी, कार्यालयीन सहकाऱ्यांनी कंबर कसली होती. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
जाधव हे २४ डिसेंबर रोजी गावाकडे जाताना माजगाव फाट्याजवळ गाडीवरून पडले. यावेळी त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने सर्वांनी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पैसेही गोळा करण्यात आले. परंतु, जाधव यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. ते समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक पदावर गेली १४ वर्षे कंत्राटी पध्दतीने कार्यरत होते.
०२०१२०२१ कोल मारूती जाधव