शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: September 11, 2015 01:10 IST

सर्किट बेंच प्रश्न : भव्य महारॅली; बहुतांशी शाळा बंद; वकिलांचे आज धरणे आंदोलन

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचप्रकरणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी फसवणूक केल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमुख व्यापारी पेठेतील दुकाने, काही शाळा, विद्यार्थी वाहतूक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. दरम्यान, शहरातील प्रमुख मार्गांवरून खंडपीठ विरोधी कृती समितीने महारॅली काढून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर शहरात सर्किट बेंच सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु हा निर्णय घेण्यापूर्वीच त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. शहा यांच्या निषेधार्थ सहा जिल्ह्यांतील वकिलांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. ‘बंद’चे आवाहन करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, वकील रस्त्यावर उतरले होते. सकाळच्या सत्रात संपूर्ण ‘कोल्हापूर बंद’ होते. दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय रॅलीची सांगता होताच काही भागांतील दुकाने अंशत: सुरू झाली. मात्र, दुपारपर्यंत शाहूपुरी, राजारामपुरी, स्टेशन रोड, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, बिंदू चौक परिसरातील दुकाने बंद होती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी बंदला पाठिंबा दिल्याने एकही विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा रस्त्यावर आली नाही. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मात्र रस्त्यावर धावताना दिसत होत्या. शहरांतर्गत बस वाहतूक तसेच एस. टी. वाहतूकही सुरू होती. बंद शांततेत पार पडला. बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा सर्किट बेंचप्रश्नी तीन दिवस वकिलांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा सत्र न्यायालयासमोर पुन्हा वकील एकत्र येऊन धरणे आंदोलन करणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. गुरुवारचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र सावंत यांनी केला.