शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण दीड वर्षात पूर्ण करणार

By admin | Updated: June 6, 2017 00:11 IST

नितीन गडकरी : मुंबई-गोवा महामार्ग; दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन २३ जूनला; सावित्री पुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क  --महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुढील टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन २३ जूनला करण्यात येणार असल्याची घोषणा करीत डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारच, असा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दुर्घटनेनंतर केवळ १६५ दिवसांत काम पूर्ण केलेल्या नवीन सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यासह कोकणातील रस्ते विकासासाठी मंजूर केलेल्या ९९०० कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे कोकण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत भविष्यात कोकण विकासाचे श्रेय नितीन गडकरी यांनाच जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, खासदार अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्री पुलाच्या दुर्घटनेची जबाबदारी सरकारचीच आहे. कमकुवत पुलाच्या दुरुस्तीबाबत त्याच वेळी कार्यवाही होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली. भविष्यात अशा महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही शासनाकडून केली जात असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम आघाडी सरकारच्या काळापासून रखडले होते. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांचा आत्मा आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामात भूसंपादनाच्या अडचणी निर्माण होत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या ६०-६५ वर्षांत जितक्या किलोमीटरचे रस्ते बांधले गेले, त्यापेक्षाही अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते गेल्या तीन वर्षांच्या काळात नितीन गडकरी यांच्या विभागाने पूर्णत्वास नेले आहेत. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर विधानसभेत निवेदन करताना पावसाळ्यापूर्वी जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यावेळी नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मी केली होती. त्याच्या प्रत्यक्ष वचनपूर्तीचे समाधान झाल्याचे सांगत, या दुर्घटनेत बळी पडलेल्या प्रवाशांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांनाच दिले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. पूर्वी कधीच दिला नव्हता इतका अधिक निधी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासासाठी दिला. त्याबद्दल गीते यांनी दोघांना धन्यवाद दिले. सावित्री पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेखही गडकरी यांनी यावेळी केला.सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दुर्घटनेनंतर मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांसह शासकीय अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, प्रधान सचिव आशिष कुमार, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी मलिकनेर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावेकेवळ कोकणातील सुमारे ६६० कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी ९९०० कोटी रुपयांच्या तीन पॅकेजेसना सरकारने मंजुरी दिली आहे. कोकणाचे भाग्य बदलण्याची ताकद या महामार्गामध्ये असल्याने कामातील अडथळे दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. सरकारकडून येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.