शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहासाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या--नाट्यगृहासाठी अंदाजे खर्च -- 50 ्रकोटी खर्च अपेक्षित

By admin | Updated: January 28, 2017 23:43 IST

शरद पवार : महापालिकेला सूचना, निधीसाठी प्रयत्न करू

कोल्हापूर : शहरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित अद्ययावत अशा नाट्यगृहाचा परिपूर्ण प्रस्ताव मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य सरकारकडे सादर करावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूर महापालिकेस केली. नाट्यगृहासाठी लागणारी जागा आणि आवश्यक तो निधी देण्याकरिता आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले. काही दिवसांपूर्वी महापौर हसिना फरास या शरद पवार यांना भेटायला बारामतीला गेल्या होत्या. त्यावेळी पवार यांनी महापौर फरास यांना शहरात केशवराव भोसले नाट्यगृहाला पर्यायी अद्ययावत नाट्यगृह उभारण्याबाबत जागा सुचविण्याचे तसेच आराखडा तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने एक आराखडा तयार केला आहे. त्याची माहिती महापौर फरास व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पवार यांना दिली. ई वॉर्ड परिसरातील शासकीय विश्रामगृहाला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या शेतीनजीक सरकारची साडेचार एकर जमीन असून, या ठिकाणी अद्ययावत नाट्यगृह उभारणे सोयीचे असल्याचे नेत्रदीप सरनोबत यांनी पवार यांना सांगितले. येथील सूरत अंजली असोसिएट यांनी सुमारे अडीच हजार प्रेक्षक क्षमतेच्या नाट्यगृहाचा आराखडा तयार केला आहे. आराखडा पाहून शरद पवार यांनी नाट्यगृहाचे फर्निचर, पार्किंग व्यवस्था, आदींबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक परिपूर्ण प्रस्ताव तसेच सरकारी जमीन मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा, असे त्यांनी सुचविले. राज्याच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून नाट्यगृहाला एकूण खर्चापैकी ७० टक्के रक्कम व जागा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तीस टक्के रक्कम महानगरपालिकेस घालावी लागणार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, उपमहापौर अर्जुन माने, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)