शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा घाट सुशोभिकरणाची प्रक्रिया चार दिवसात पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST

कोल्हापूर : पंचगंगा घाट सुशोभिकरणातील हेरिटेज समितीने घेतलेले आक्षेप दूर करून सोमवारपर्यंत घाट सुशोभिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करा, अशी ...

कोल्हापूर : पंचगंगा घाट सुशोभिकरणातील हेरिटेज समितीने घेतलेले आक्षेप दूर करून सोमवारपर्यंत घाट सुशोभिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करा, अशी सूचना खासदार संजय मंडलिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका प्रशासनाला केली.

पंचगंगा नदीवरील घाट सुशोभिकरणाचे काम गेले वर्षभर बंद आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शासकीय विश्रामृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता धनंजय भोसले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

कोल्हापूर शहर नागरी कृती समिती सदस्यांनी हेरिटेज समितीवर टीकेची झोड उठवत, कोल्हापूरच्या विकासकामांत आडकाठी ठरणारी हेरिटेज समितीच बरखास्त करा, अशी मागणी यावेळी केली.

पंचगंगा घाट हेरिटेज स्थळांच्या यादीत असणार्‍या ब्रम्हपुरीपासून शंभर मीटरच्या आत असल्याने केंद्रीय पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय घाट सुशोभिकरण करता येणार नाही, असा आक्षेप हेरिटेज समितीने घेतला आहे. यावर बैठकीत वादळी चर्चा झाली. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे यासंबंधी काही व्यक्तींनी तक्रार केल्याने पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या तोंडी सूचनेवरून हे काम थांबविण्यात आले, अशी माहिती हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

कृती समितीचे सदस्य अशोक पोवार, रमेश मोरे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, प्रशांत कदम यांच्यासह सर्वांनीच याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. हेरिटेज समितीकडे काही विघ्नसंतोषी लोक तक्रारी करुन विकासकामात अडथळा आणत आहेत, असा थेट आरोप सदस्यांनी केला. हेरिटेज समितीमधील दोन सदस्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण आणि संवर्धनाचं काम रखडल्याबद्दल बैठकीत सर्वांनीच आक्रमक भूमिका घेतली.

केंद्रीय पुरातत्व विभागानं पंचगंगा घाट संवर्धनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन करणारे पत्र महापालिकेने पाठवले आहे, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. ऐतिहासिक स्थळांंचे संवर्धन, संरक्षण करणे हे केंद्रीय पुरातत्व आणि हेरिटेज समितीचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी नियमांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, हा आपला आग्रह असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी सांगितले.