शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३१ मे पर्यंत जमीन मोजणी पूर्ण

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

ई रवींद्रन यांची माहिती : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण

सिंधुदुर्गनगरी : मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांना गती आली असून १ ते ३१ मे या कालावधीत झाराप ते खारेपाटणपर्यंतची जमीन मोजणी पूर्ण केली जाणार आहे. यासाठी १० एप्रिल रोजी संबंधित सर्व जमीन मालकांना नोटिसा बजावण्यात येणार असून जमीन मालकांच्या मिटींगाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी मंगळवारी दिली.मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बाबतीत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, वनविभागाचे अधिकारी, सर्व्हेअर, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली व काही निर्णयही घेण्यात आले. महामार्ग चौपदरीकरण कामकाजाबाबतच्या कामांना आता वेग येणार आहे.१ ते ३१ मे या कालावधीत झाराप ते खारेपाटण यापर्यंतच्या भूसंपादन प्रक्रियेस प्रत्यक्ष सुरूवात केली जाणार आहे. जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित जमीन मालकांना १० एप्रिल रोजी जमीन मोजणीच्या नोटिसा बजावण्यात येणार आहे. तर पुढील आठवड्यात प्रांताधिकाऱ्यांमार्फत स्थानिक जमीनदारांना समजून सांगण्यासाठी तालुकानिहाय बैठकींचे आयोजन करण्यात येईल. प्रत्यक्ष जमीन मोजणीनंतरच एकूण किती क्षेत्र संपादीत करावे लागणार हे निश्चित होणार आहे. सप्टेंबर २०१५ पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ््यानंतर प्रत्यक्ष महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांना सुरूवात होणार आहे. जमीन मोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक निधी प्राप्त झाला असून महिन्याभरात मे मध्ये मोजणी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली. (प्रतिनिधी)मोजणी झाल्यानंतर मिळणार मोबदलामहामार्गासाठी लागणारी जागा भूसंपादीत झाल्यानंतर व तसा अहवाल शासनास पाठविल्यानंतर महामार्ग विभागाला प्रत्यक्षात किती जागेची गरज आहे, हे पाहून नंतरच जमिनीचा मोबदला हा जमीन मालकांना दिला जाणार आहे.भूसंपादन प्रक्रियेसाठी आठ टीम स्थापन१ ते ३१ मे दरम्यान होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळावी यासाठी एकूण आठ टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वेअर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आदींचा समावेश केला आहे.