शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना मंगळवारी दिल्या.

या बैठकीत पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रश्न व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढले जातील. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठात नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार प्रकाश आबिटकर यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी राज्यातील उच्चशिक्षण विभागाच्या कोल्हापूर येथील विभागीय सहसंचालक कार्यालयातील गैरकारभाराच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी आबिटकर यांनी प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या कार्यालय प्रमुख यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली.

मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालबध्द कार्यक्रम तयार करा. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येईल. त्याची सुरवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करून, जे अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी आढळतील अशा दोषी अधिकारी व कर्मचारी यांना जागेवर निलंबित करण्यात येईल.

यावेळी विभागीय सह. संचालक डॉ. अशोक उबाळे, प्रिआयएएस सेंटर कोल्हापूरच्या संचालिका सोनाली रोडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी विशांत भोसले, प्रा. शशिकांत कांबळे उपस्थित होते.

-

फोटो नं ०५०१२०२१-कोल-उदय सामंत बैठक

ओळ : मुंबईत राज्यातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कामकाजाची आढावा बैठक मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.