शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

पोलिसांनी मारहाण केल्याची तावडेची न्यायालयात तक्रार

By admin | Updated: September 4, 2016 01:20 IST

पानसरे हत्या प्रकरण : पुन्हा वैद्यकीय तपासणी; पाच दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेला हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याला शनिवारी सत्र न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांनी गुरुवार (दि. ८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तावडे याने पोलिसांनी आपणाला बुटांच्या लाथांनी छातीवर, पोटावर, गालावर, डोक्यात व डाव्या पायावर मारहाण केल्याने छातीत दुखत आहे. रात्रभर उलट्यांचा त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यावर न्यायाधीश पाटील यांनी आरोपी तावडे याची तत्काळ सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्यांदा तावडेची ‘सीपीआर’मध्ये तपासणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायाधीशांनी पोलिस कोठडीचे आदेश दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेल्या डॉ. तावडे याचे ‘कोल्हापूर कनेक्शन’ तपासात पुढे आले आहे. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने त्याचा शुक्रवारी (दि. २) येरवडा कारागृहातून ताबा घेतला. त्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर त्याला हजर केले. सुरुवातीस न्यायाधीशांनी तावडेला पोलिसांविरोधात तुमची काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर तावडेने पोलिसांनी मला शुक्रवारी रात्री खूप मारहाण केली. मला उच्च रक्तदाब, मधुमेह व डोकेदुखीचा त्रास असून औषधे सुरू आहेत, याची कल्पना पोलिसांना देऊनही तपास अधिकारी सुहेल शर्मा, अमृत देशमुख यांनी बुटांच्या लाथांनी छातीवर, पोटावर, गालावर, डोक्यात व डाव्या पायावर मारहाण केल्याने छातीत दुखत आहे, रात्रभर उलट्यांचा त्रास होत आहे. माझ्याबाबतीत काही गंभीर पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याबाबतीत माझ्याकडे त्यांनी सखोल चौकशी करावी; परंतु माझ्या वयाचा व शारीरिक व्याधींचा विचार करून मारहाण करू नये, त्यासाठी आपण मदत करावी, अशी माझी प्रार्थना आहे. यावेळी न्यायाधीशांनी तावडेला ‘मारहाणीचे वळ दाखवू शकता काय?’ अशी विचारणा केली. त्यावेळी त्याचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘पोलिस खूप हुशार आहेत. मारहाणीचे वळ उठणार नाहीत, अशा पद्धतीने ते मारहाण करतात.’ असे सांगितले. तावडेने डाव्या पायावरील पॅँटवर बुटाचा वळ असल्याचे दाखविले. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतल्यानंतर त्या रात्री ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी केली आहे. तो पोलिसांवर खोटे आरोप करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने वैद्यकीय अहवालाची मागणी केली. सीपीआर प्रशासनाकडून अहवाल न घेतल्याने तो हजर करण्यासाठी तासाभराची वेळ द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी शर्मा यांनी केली. त्यानंतर शर्मा यांनी चौकशीकामी तावडेला चौदा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली. त्यावर आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेत पानसरे खूनप्रकरणी समीर गायकवाड याला अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये तावडेवर संशय आला नाही. ‘सीबीआय’ने दाभोलकर खूनप्रकरणी तावडेला अटक केली. त्यानंतर हे पानसरे खुनाच्या चौकशीसाठी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करीत आहेत. या तपास यंत्रणेकडे कसलाही पुरावा नाही. तावडे याचा पानसरे खून प्रकरणात काही संबंध नाही; त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. पोलिस कोठडीच्या मुद्द्यावर दोन्ही वकिलांत जोरदार खडाजंगी झाली. तपास अधिकारी शर्मा यांनीही तावडेला पोलिस कोठडी मिळणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे न्यायालयासमोर विशद केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अखेर न्यायाधीश पाटील यांनी तावडेच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट करीत पोलिसांना तपासणीचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्यांदा तावडेची ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ती सुरू असताना न्यायालयीन कामकाजाची वेळ संपली असतानाही न्यायालय पोलिसांच्या अहवालाची प्रतीक्षा करीत थांबले. सुमारे दोन तासांनी पोलिस तावडेसह वैद्यकीय अहवाल घेऊन न्यायालयात आले. अहवाल पाहून त्यांनी तपासकामी तावडेला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. -------------------------७५ दिवसांनी साक्षात्कार होतो का? ‘सीबीआय’ने १ जून २०१६ रोजी सकाळी साडेआठ वाजता न्यायालयाच्या परवानगीने पनवेल येथील डॉ. तावडेच्या घरी छापा टाकला. देशभरातील गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ‘सीबीआय’ यंत्रणेच्या हाती डायरी, नोटबुक, दोन फोन व त्यांचे कव्हर लागले. याव्यतिरिक्त काहीच सापडले नाही. त्यानंतर १० जूनपर्यंत बेलापूर (मुंबई) येथील कार्यालयात रोज चौकशी करून त्यादिवशी त्याला अटक केली. त्यानंतर दहा दिवसांची कोठडी मिळाली. या चौकशीमध्ये ‘सीबीआय’च्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर २० जूनला ‘एसआयटी’ने त्याचा ताबा मागितला. त्यास पुण्याच्या न्यायालयाने मंजुरी दिली. त्यानंतर ७५ दिवसांनी तावडेचा ताबा घेण्यासंबंधी ‘एसआयटी’ला साक्षात्कार होतो का? यापूर्वी त्यांनी का घेतले नाही, असा मुद्दा अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.