शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या संदर्भात आमदार राजू आवळे यांनी विशेष प्रयत्न शासनदरबारी करीत सतत पाठपुरावा केला. याला यश मिळून शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई हातकणंगले तालुक्याला मिळाली असून, लाटवडे गावासाठी २९ लाख १६ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

मे महिन्यात प्रचंड गारपिटीचा पाऊस झाला. लाटवडे, सावर्डे गावांतील ऊसशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. इतर गावांतही केळी, भाजीपाला पिके उद‌्ध्वस्त झाली होती. याची दखल घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आमदार राजू आवळे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. खासदार धैर्यशील माने यांनीही अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी केली होती. परिसरातील नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून माहिती वरिष्ठ विभागाला पाठवा, अशा सूचना दिल्या. राजू आवळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादासो भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. आवळे यांनी नुकसान भरपाई मिळवून देणारच हा शेतकऱ्यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे.

सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी ७२६ शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. लाटवडे, सावर्डे, नेज, किणी, वाठार तर्फ वडगाव, घुणकी, चावरे, तळसंदे, भादोले येथील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

चौकट-

गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदत होणे ही गरज होती. यासाठी जो पाठपुरावा केला त्याला यश आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांचे या कामी सहकार्य लाभले.

- राजूबाबा आवळे, आमदार, हातकणंगले विधानसभा