शिरोली : हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महापुरामुळे हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतातील पिके, जनावरे व घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पंचगंगा नदीक्षेत्रात शिरोली पुलाची, हालोंडी, हेरले, रुकडी, रूई, इंगळी, पट्टणकोडोली, रेंदाळ तसेच वारणा नदीक्षेत्रात निलेवाडी, जुने पारगाव, चावरे, किणी, घुणकी, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार, हिंगणगाव, लाटवडे, कुंभोज या गावांना नदीच्या महापुराने नेहमीच मोठा फटका बसतो. या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे, सुरेश पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवान काटे, ऋषिकेश सरनोबत, तानाजी पाटील व प्रताप पाटील उपस्थित होते.
फोटो : ३१ शिरोली भाजप निवेदन
-
हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी भगवान काटे, भूपाल कांबळे उपस्थित होते.