शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेतील पैशावरून समिती सदस्याचा खून !

By admin | Updated: April 30, 2015 00:49 IST

काटेवाडी येथील घटना : आरोपी पितापुत्राला अटक

पुसेगाव : श्री मानाप्पा यात्रा कमिटीच्या बैठकीत वार्षिक यात्रेत पैशाच्या हिशेबावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून काटेवाडी (ता. खटाव) येथील संजय शंकर कोरडे (वय ४४) यांचा मंगळवारी रात्री काटेवाडी (बुध) फाट्याजवळ धारदार हत्याराने निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी पितापुत्राला अटक केली आहे. धनंजय कोरडे (५४) व मुलगा संतोष कोरडे (२६, रा. काटेवाडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, यात्रा झाल्यानंतर दरवर्षी समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत वर्षाचा जमा-खर्च द्यावयाचा असतो. यात्रा समितीत २०१३ पासून धनंजय बाळकृष्ण कोरडे, संजय शंकर कोरडे यांच्यासह अन्य तिघेजण पंच म्हणून काम पाहत आहेत. या गावची वार्षिक यात्रा नुकतीच पार पडली होती.सोमवार (दि. २७) धनंजय कोरडेने संजय यांच्याशी मोबाईलवर ‘यात्रेतील हिशेबाचे पैसे आजच्या आज माझ्याकडे जमा करा,’ असे सांगितले होते. ‘मी सध्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेर आहे. संध्याकाळी मीटिंगमध्ये पैसे जमा करतो,’ असे संजय यांनी त्याला प्रत्त्युतर दिले. यात्रा समितीची बैठक सोमवारी सायंकाळी सहा वाजता होती. यावेळी बैठकीत समितीतील काही सदस्यांनी ‘धनंजय कोरडे हा इतर सदस्यांना विश्वासात घेत नसून मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे आम्ही समितीचा राजीनामा देतो,’ असे सांगत पाच पैकी तीन सदस्यांनी ग्रामस्थांसमोर राजीनामे दिले होते. यावेळी धनंजय कोरडे व संजय कोरडे यांच्यात बाचाबाचीही झाली होती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संजय कोरडे हे एकत्र कुटुंबासह जेवण करीत असताना त्यांना कोणाचा तरी फोन आला. जेवण झाल्यानंतर संजय दुचाकीवरून काटेवाडी फाटा येथील कमानीजवळ गेले. घरातील मंडळी लग्नाच्या तयारीच्या कामात व्यस्त असतानाच गावातील एका व्यक्तीने संजय जखमी अवस्थेत पडले असल्याचा निरोप त्यांच्या घरी दिला. संजय यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व सहा भाऊ असा परिवार आहे. उत्तम शंकर कोरडे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी धनंजय कोरडे व संतोष कोरडे या पितापुत्राला अटक केली आहे. (वार्ताहर)चार ठिकाणी वार..धारदार शस्त्राने गळा व डोक्यासह अंगावर चार ठिकाणी वार केले गेले असल्याने संजय गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. काही नागरिकांनी त्यांना तातडीने पुसेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र प्रकृती चिंत्ाांजनक असल्याने कोरेगावला नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.