शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

आयुक्तांचे अंदाजपत्रकही पालिकेला डोईजड

By admin | Updated: July 28, 2015 01:05 IST

एलबीटी रद्दचा झटका : शासनाकडून सुमारे ६५० कोटींची अपेक्षा

नाशिक : महाराष्ट्र शासनाकडून येत्या १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यासंबंधी सुरू झालेल्या हालचाली आणि दुसरीकडे स्थायी समितीने ३३२.३० कोटी रुपयांची वाढ सुचवत १७९६.९७ कोटी रुपयांपर्यंत प्रारूप अंदाजपत्रक नेऊन ठेवल्याने यापुढील काळात उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ कसा घालायचा, याबाबतचे अवघड गणित नाशिक महापालिकेला सोडवावे लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून महापालिकेच्या झोळीत अवघे २०० ते २२५ कोटी रुपये पडणार असून, अन्य करांच्या माध्यमातून सुमारे ३७० कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज आहे. पालिकेचा संभाव्य बांधील खर्चच ७८९ कोटी रुपये असल्याने तो स्वत:च्या उत्पन्नातून भागवितानाच मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. परिणामी, आयुक्तांनी मांडलेले १४३७.६७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही महापालिकेला डोईजड ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. महाराष्ट्र शासनाने २४ जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्ध करत ५० कोटी रुपयांवरील उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठीच एलबीटी आकारणीचा निर्णय घेतला असून, त्यावर ३१ जुलैपर्यंत हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे आॅगस्टपासून ५० कोटींच्या आत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांना लागू असलेला एलबीटी रद्द होणार आहे आणि शासनाने त्यादृष्टीने तयारीही आरंभली आहे. ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून नाशिक महापालिकेच्या खजिन्यात सुमारे २०० ते २२५ कोटी रूपये पडणार आहेत, तर ३२ हजार व्यापाऱ्यांनी केलेली नोंदणी रद्द होऊन महापालिकेला त्यापोटी सुमारे ४५० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून सुमारे ७०० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होते. ५० कोटींच्या आतील व्यावसायिकांना एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होऊन त्याचा अंदाजपत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १४३७.३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात आयुक्तांनी एलबीटीच्या माध्यमातून ८७६.८३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे, तर अन्य करांच्या माध्यमातून ३६७.९२ कोटी रुपये उत्पन्न त्यांनी गृहित धरले आहे. आयुक्तांना एकूण १२४४.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. आयुक्तांच्या या अंदाजपत्रकात आता स्थायी समितीने तब्बल चार महिन्यांच्या विलंबानंतर ३३२.३० कोटी रुपयांची वाढ सुचवित अंदाजपत्रक १७६९.९७ कोटी रुपयांच्या घरात नेऊन ठेवले आहे. आता स्थायीचे अंदाजपत्रक महासभेवर सादर होणार असून, त्यात महासभेकडूनही कोट्यवधींची भर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची मोठी तारांबळ उडणार असून, उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेता आयुक्तांनीच सादर केलेले अंदाजपत्रक पूर्णत्वाला जाते किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. (प्रतिनिधी)