शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी सभागृहाचा सन्मान राखावा

By admin | Updated: October 24, 2016 00:50 IST

सुनील कदम : असंसदीय भाषा थांबवा

कोल्हापूर : महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सभागृहाचा सन्मान राखावा, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम यांनी रविवारी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, बाबासाहेब कसबेकर, द. न. कणेरकर, शामराव शिंदे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी तर पृथ्वीराज बायस, सुधाकर जोशी, जयरथ यांच्यासारख्या प्रशासकांनी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे संबंध कसे असावेत, याचे एक मूर्तिमंत उदाहरण होते. असा इतिहास असणाऱ्या महापालिकेत एक प्रशासकीय अधिकारी ‘हात-पाय बांधून पळा म्हणतात,’ अशी असंसदीय भाषा जनतेतून निवडून आलेल्या ८१ नगरसेवकांच्या समोर काढत असतील तर यापूर्वी झालेल्या महागाई, घरफाळा, टोलसारख्या अन्यायाविरुद्ध एकेकाळी महाराष्ट्रात ‘एल्गार’ ठरलेली आंदोलने एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात कोल्हापुरात पुन्हा होतील. त्यामुळे यापुढे सभागृहाच्या कामकाजात बोलताना अशाप्रकारे असंसदीय शब्द येऊ नयेत याची काळजी आयुक्तांनी घ्यावी. वास्तविक, जनतेची कामे करण्यासाठी पदरमोड करून आम्ही व आमचे सहकारी महापालिकेत निवडून आलोय. निवडणुकीपासून आजपर्यंत प्रभागात एक दमडीचाही निधी आम्हाला मिळालेला नाही. जनतेचा रेटा असतानाही निव्वळ संपर्काच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागात कार्यरत आहोत तरीही, नगरसेवकांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा संशयकल्लोळ उभा करून आपण स्वच्छ प्रशासक असल्याचा ‘विश्वामित्री पवित्रा’ घेणाऱ्या आयुक्तांचा सहकारी आयुक्तांच्या हिटलरशाहीविरोधात सभागृहात अश्रू ढाळत असेल तर आपल्या अरेरावीला आपल्याजवळचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी किती वैतागले असतील तर याचे आत्मचिंतन आयुक्तांनीच केलेले बरे. सभागृहामध्ये नगरसेवकांनी जर शहराच्या हिताची माहिती विचारली तर त्यामध्ये आयुक्तांसारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी थयथयाट करायची गरज काय?, पालिकेच्या इतिहासात अधिकाऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये आलेली स्वेच्छानिवृत्तीची लाट आयुक्तांच्या वर्तणुकीचे एक उदाहरण म्हणावे लागेल. तर जशास तसे उत्तर देऊ काही प्रमाणात लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाबाबतीत गैरवर्तन घडत असेल त्याचीही खबरदारी घेत आहोत; पण सर्व नगरसेवक सभागृहात विकासाबाबतीत एकच आहोत. आयुक्तांमुळे जर शहराच्या सुधारणेत विकासात्मक भर पडत असेल तर आम्ही हात-पाय बांधून पळायलासुद्धा तयार आहोत व त्यासाठी आम्हास काही गैर वाटत नाही. मात्र, यापुढे नगरसेवकांच्या विरोधात सभागृहात ‘असंसदीय भाषा’ वापरली तर राजर्षी शाहूंच्या नगरीतील हा नगरसेवक या आयुक्तांच्या उद्दामपणाला व हिटलरशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देतील तसेच याचे भान यापुढे आयुक्तांनी राखून लोकप्रतिनिधींचा सन्मान करावा.