कोरोनामुळे समाजामध्ये काही प्रमाणात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सकारात्मक मुद्दे तसेच सकारात्मक विचार लोकांसमोर यावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. सद्य:स्थितीतील ‘चला करूया सकारात्मकतेचा प्रचार’ आणि ‘प्रसार करूया प्रेम-दयेचा’ या विषयांनुसार लेखकांनी लेख लिहायचे असून, यासाठी शब्दमर्यादा नाही. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम ३००० रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम २००० रुपये आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम १००० रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी लेखकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आहे. यासाठी लेख पूर्णपणे स्वयंलिखित असावेत. १५ जानेवारी २०२१ पर्यंत सर्वांनी राजारामपुरी दुसरी गल्ली, निगडे हॉस्पिटलशेजारी, सावित्री बंगला येथील ‘माइंड इट संवाद’ या कार्यालयात हे लेख पाठवावेत. तरी जास्तीत जास्त लेखकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘द संवाद टीम’कडून करण्यात आले.
वाणिज्य बातमी : ‘द संवाद’कडून लेखन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST