कोल्हापूर : सामान्यांना परवडणाऱ्या कमी खर्चात गरम पाणी केवळ रॉनिक इन्स्टंट वॉटर हीटिंग सिस्टीममुळे अवघ्या काही सेकंदात मिळणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी रॉनिक अप्लायन्सेस, हॉटेल दख्खनशेजारी, शाहू रोड, व्हिनस कॉर्नर-दसरा चौक रोड, कोल्हापूर येथे शनिवारपासून चारदिवसीय वाॅटर हीटिंग सिस्टीम प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
पावसाळा असो की हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आपल्याला अंघोळीसाठी गरम पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे अनेकदा हे पाणी गॅसवर किंवा चुलीवर तापविले जाते. ही वेळ खाऊ व खर्चीक प्रक्रिया आहे. काही वेळा धोकादायक पर्यायही असतात. या सर्वांना फाटा देऊन ग्राहकांची गरज आणि मागणीचा विचार करून उत्तम पर्याय म्हणजे रॉनिक वॉटर हीटिंग सिस्टीम कंपनीने बाजारात आणली आहे. ही सिस्टीम कुटुंबाच्या सुरक्षिततेसह काही सेकंदात गरम पाणी देते. विजेच्या केवळ एका युनिटमध्ये ७० ते १०० लिटर गरम पाणी मिळते. फायबर बाॅडी हीट, गंज, शाॅकप्रूफ आहे. इतर सिस्टीम व गीझरपेक्षा ही स्वस्त आहे. वीज, वेळ, श्रम आणि पैशाचीही बचत होते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ती अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. खरेदीसाठी कोल्हापूर
येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस, हॉटेल दख्खनशेजारी, शाहू रोड, व्हिनस कॉर्नर-दसरा चौक रोड, कोल्हापूर तर इचलकरंजी येथे राॅनिक अप्लायन्सेस, बीएसएनएल ऑफिससमोर यारणा बँकेशेजारी, हुलगेश्वरी रोड, इचलकरंजी येथे उपलब्ध आहे. खास पावसाळ्यानिमित्त ग्राहकांना ३७९० चा हीटर २७९० रुपयांना मिळणार आहे. ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी. राॅनिकची उत्पादने अतिशय दर्जेदार असून, फसवणुकीपासून सावध राहा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
फोटो : १५०१२०२१-कोल-राॅनिक