कोल्हापूर : एमजी हेक्टर २०२१, हेक्टर प्लस ६ आणि ७ सीटर, इलेक्ट्रीक कार, गोल्स्टर या कारना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मॉरिस गॅरेजेस या ब्रिटिश ब्रॅण्डनने हेक्टर सीव्हीटी ही नवीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रीमियम एसयुव्ही कार बाजारात आणली आहे. ती कोल्हापुरात शिरोलीतील युनिकच्या शोरूममध्ये दाखलही झाली आहे.
नवीन हेक्टर सीव्हीटीमध्ये पूर्वीच्या हेक्टर कारप्रमाणेच इंटरनेट इन्साईड, व्हाईस कमांड पेनोमॉमिक सॅनरुफ, ड्यूअल टोन अप्लाय व्हील, वायरलेज चार्जर, व्हेटीलेटेड फ्रंड सीट सोबतच ३७ नवीन हिंदी व्हाईस कमांड, इंफोटेमेंट सिस्टीम दिल्या आहेत. पाच आणि सहा सीटरमध्ये कार उपलब्ध करून दिली आहे. सीव्हीटी ट्रान्समिशनमुळे अल्हाददायक ड्रायव्हिंग, उत्तम मायलेज आणि चांगला पीक अप अनुभवता येणार आहे. १६.५१ लाख रुपये अशी एक्स शोरूम किंमत आहे. ही कार ग्राहकांना पसंतीस पडणारी आहे. शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन युनिकचे सीईओ निखिल शिंदे यांनी केले आहे.
फोटो: १३०२२०२१-कोल-एमजी हेक्टर कोल्हापूर