शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

वाणिज्य : बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST

कोल्हापूर : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र या महाबँकेच्या क्रेडिट कार्डचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. ‘बॅंक ऑफ महाराष्‍ट्र क्रेडिट कार्ड’ या ...

कोल्हापूर : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र या महाबँकेच्या क्रेडिट कार्डचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. ‘बॅंक ऑफ महाराष्‍ट्र क्रेडिट कार्ड’ या सुविधेचे ग्राहकांसाठी लोकार्पण करण्यात आले. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांच्या हस्ते ही सेवा सुरु करण्यात आली. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया, उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. एस. प्रसाद उपस्थित होते. बँकेचा ग्राहक मेळावा व सर्व शाखा व्यवस्थापकांची यावेळी बैठक घेण्यात आली. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात ग्राहक व शाखाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजीव म्हणाले, रिटेल कर्ज विभागातील स्पर्धात्मक व्याजदरामध्ये बॅंक ऑफ महाराष्‍ट्र ही सार्वजनिक बॅंकांमध्ये अग्रगण्य बॅंक आहे. महाबॅंकेच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्‍यातील सर्व शाखांनी गृहकर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यवसाय कर्ज, कृषी कर्ज व महाबॅंक सॅलरी अकाऊंट स्कीममध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.

चौकट

गोल्ड लोन पॉईंटमुळे १५ मिनिटात कर्ज

विभागीय व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया यांनी विविध योजना व ग्राहक सेवांसोबतच गृहकर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, देश-विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि मालमत्ता तारण कर्जासह बँकेच्या विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राजारामपुरीतील गोल्ड लोन पॉईंट योजनेत कृषी व रिटेल गोल्डचे अत्यंत कमी व्याजदरात केवळ १५ मिनिटात कर्ज देण्यात येते. याचा कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ग्राहकांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोटो : ०२०१२०२० कोल बँक ऑफ महाराष्ट्र न्यूज

ओळी : कोल्हापुरात बॅंक ऑफ महाराष्‍ट्र क्रेडिट कार्डचे शुक्रवारी ग्राहकांना वितरण करण्यात आले. यावेळी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव, प्रादेशिक व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया उपस्थित होते.