शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ कायदा मूल्यमापन समितीच्या बैठकीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:28 IST

Shivaji University, Kolhapurnews सार्वजनिक विद्यापीठे कायद्याच्या सर्वच घटकांचे पुनरावलोकन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने या घटकांच्या लेखी सूचनांचा विचार करून त्यातील योग्य व चांगल्या सूचना विचारात घेऊन कायद्यात सुधारणा सुचविण्यात येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात विद्यापीठ कायदा मूल्यमापन समितीच्या बैठकीस प्रारंभयोग्य सूचना विचारात घेऊन कायद्यात सुधारणा सुचविण्यात येतील: सुखदेव थोरात

कोल्हापूर : सार्वजनिक विद्यापीठे कायद्याच्या सर्वच घटकांचे पुनरावलोकन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने या घटकांच्या लेखी सूचनांचा विचार करून त्यातील योग्य व चांगल्या सूचना विचारात घेऊन कायद्यात सुधारणा सुचविण्यात येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी येथे सांगितले.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम-२०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी डॉ. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मूल्यमापन समिती ही उपसमिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोनदिवसीय बैठकांना सोमवारी सकाळी विद्यापीठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीने प्रारंभ झाला. त्यावेळी डॉ. थोरात यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

आतापर्यंत समितीला विविध सुमारे २५० सूचना प्राप्त झाल्या आहेत. आणखी सूचना अपेक्षित आहेत. कुलगुरू, कुलसचिव, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आदी सर्व संबंधित घटकांचे या कायद्याच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरातील अनुभव, अडचणी विचारात घेऊन त्यांनी केलेल्या सूचनांवर विचारविनिमय करण्यात येईल, असे डॉ थोरात यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदींसह समिती सदस्य उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रास्ताविक केले.उपसमितीतील सदस्यया उपसमितीच्या सदस्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, डॉ. राजन वेळूकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा, अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, विल्सन महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. टी. ए. शिवारे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठuniversityविद्यापीठkolhapurकोल्हापूर