शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वडिलांचे अंत्यसस्कार आटोपून थेट रंगमंचावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:31 IST

कोल्हापूर : वडिलांवर अंत्यसंस्कार करुन थेट रंगमंचावर येवून राहूल पाटील या कलाकारांने ‘सोकाजीराव टांगमारे’ चा नाट्यप्रयोग केला. कलेप्रती त्याची ही समर्पीत वृत्ती पाहून रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृह गहिवरले.केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी सायंकाळी अभिनेते संजय मोहिते व राजश्री खटावकर यांचा ‘सोकाजीराव टांगमारे’ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. यातील कलाकार ...

कोल्हापूर : वडिलांवर अंत्यसंस्कार करुन थेट रंगमंचावर येवून राहूल पाटील या कलाकारांने ‘सोकाजीराव टांगमारे’ चा नाट्यप्रयोग केला. कलेप्रती त्याची ही समर्पीत वृत्ती पाहून रविवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृह गहिवरले.केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी सायंकाळी अभिनेते संजय मोहिते व राजश्री खटावकर यांचा ‘सोकाजीराव टांगमारे’ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. यातील कलाकार राहुल पाटील यांचे वडील काही दिवसांपासून रुग्णालयात अत्यवस्थ होते. यातील पहिल्या अंकातील ‘पोऱ्या’ व दुसºया अंकातील तृतीयपंथी ‘कोकिळा’ची भूमिका साकारणारा राहुल पाटील यांच्या वडिलांचे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सर्व कलाकारांपुढे, एकीकडे प्रयोग हाऊसफुल्ल ठरल्याने, राहुल साकारत असलेली भूमिका आता ऐन वेळी कोण साकारणार असा प्रश्न आ वासून उभा राहिला. दरम्यान, राहुलने ही बाब स्वत: जाणून दुपारी चार वाजता वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण केले व तो थेट नाट्यगृहात आला. त्याने मागचा-पुढचा विचार न करता मेकअप रूममध्ये जाऊन ‘कोकिळा’चा गेटअप केला. दुसºया अंकातील ‘कोकिळा’ ताकदीने सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. प्रयोगानंतर राहुलच्या वडिलांच्या निधनाची माहिती रसिकांना समजली. कलाकार कला किती श्रेष्ठ समजतो व कलेवरील त्यांचे प्रेम किती नि:स्सीम असते, याचा हा गहिवरून टाकणारा अनुभव संपूर्ण नाट्यगृहाने घेतला.गेल्या काही दिवसांपासून या नाटकाची रिहर्सल सुरू होती.रविवारी यातील कलाकार राहुल पाटील याच्या वडिलांचे निधन झाले.मात्र रसिकांसाठी राहुल वडिलांचे अंत्यसंस्कार उरकून पुन्हा रंगमंचावर आला आणि त्याने ‘कोकिळा’ ही भूमिका साकारत प्रयोग यशस्वी केला. यातून कलाकारांना खºया आयुष्यात किती आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, ही बाब पुन्हा एकदा समोर आली.- संजय मोहिते, अभिनेता