शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

श्रावण सोहळ््यात रंगला कॉमेडीचा मेळा

By admin | Updated: August 29, 2015 00:30 IST

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत : विविध स्पर्धांमुळे रंगत

कोल्हापूर : सौभाग्याचे प्रतीक असलेल्या हिरव्या साड्या, गजऱ्यापासून ते पायातल्या जोडवीपर्यंतचा साज-श्रृंगार केलेल्या सखी, मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, पानं, फुलं औषधी वनस्पतींपासून बनविलेल्या अलंकारांचा साज लेत रॅम्पवर उतरलेल्या सौंदर्यवती, विविध स्पर्धा...सोबत कॉमेडीचा तडका देत सखींच्या अलोट गर्दीत ‘श्रावण सोहळा’ रंगला. शुभंकरोती सांस्कृतिक हॉल येथे ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’ प्रस्तुत ‘श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा’ हा कार्यक्रम झाला. यासाठी सह-प्रस्तुतकर्ता मेडिमिक्स व इन्शुरन्स पार्टनर म्हणून बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स यांचे सहकार्य लाभले. बिर्ला सनलाईफ इन्श्युरन्सचे ब्रँच मॅनेजर आशिष बोरकर, एरिया ट्रेनिंग मॅनेजर चंद्रशेखर कळमकर, मेडिमिक्सचे एरिया सेल्स मॅनेजर शफी शेख, शुभंकरोती हॉलच्या संचालिका राजमती सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात इनोव्हेटिव्ह मेडिमिक्स हर्बल फॅशन शोने झाली. त्यात सखींनी काकडी, कारली, आंब्याची पानं, नारळाच्या करवंट्या, खाऊची पानं, गुलाब, जास्वंद, मोगरा, केवडा, झेंडू, तुळस या वनस्पती व फुलांपासून सुंदर अलंकार बनवून त्याचा श्रृंगार केला होता. निसर्गाचा साज लेवून रॅम्पवर आलेल्या सखींना हात उंचावून आणि शिट्ट्यांनी प्रोत्साहन दिले जात होते.यावेळी उगारच्या उगार महिला मंडळ सांस्कृतिक ग्रुपच्या महिलांनी पारंपरिक झिम्मा-फुगडी, मंगळागौरचे खेळ सादर करून श्रावणोत्सवाचा आनंद सखींना दिला. त्यात अवघ्या आठ वर्षाच्या मुलीपासून ते साठीच्या आजींपर्यंतच्या महिलांनी पारंपरिक वेशात सादर केलेल्या कसरती सादर केल्या. ‘वॉव’ असे आश्चर्याचे बोल आणि टाळ््यांनी सखींनी या खेळाला प्रतिसाद दिला. राखी थाळी सजावट स्पर्धा झाली. त्यानंतर ‘दादांचा वारसदार’ नितीन कुलकर्णी व मंजू खेत्री यांनी विनोदी नाटिका सादर करून सखींना हसता-हसता अंतर्मुख केले. पती-पत्नीमधील नाते वयाच्या विविध टप्प्यांवर कसे असते, यावर मार्मिक व धमाल विनोदी नाटिका त्यांनी सादर केली. नितीन कुलकर्णी यांचा आकाशवाणीवर फोन करून आवडते गाणे लावायला लावणारा आत्माराम बुद्धिसागर कमाल करून गेला. डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टच्या संचालिका प्रतिमा पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे ब्रँच मॅनेजर आशिष बोरकर यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा सल्ला देत इन्शुरन्समधील करिअर संधींविषयी माहिती दिली. मेडिमिक्स हर्बल साबणाचे महत्त्व सखींना सांगितले. वृषाली शिंदे-खैरमोडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून नीलम मोरे, आशा माळकर, प्रिया मेंच यांनी काम पाहिले. मेहंदीचा रंग..झुल्याचा संग...श्रावण म्हणजे सण-समारंभ, व्रतवैकल्य, उत्साह, मांगल्याचे प्रतीक असलेल्या या श्रावण सोहळ््याचा अनुभव सखींना देत प्रशस्त व हवेशीर अशा शुभंकरोती हॉलच्या लॉनमध्ये सुरेख सजावट करण्यात आली होती. येथे आलेल्या प्रत्येक सखीला हळदी-कुंकू, गजरा, वाण म्हणून कुंकवाचा करंडा दिला जात होता. याशिवाय महिलांच्या हातावर मेहंदी काढून दिली जात होती. फुलांनी सजवलेल्या झुल्यावर बसून सखींनी झोपाळ््याचा आनंद लुटला.