शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’साठी भाजपसोबत एकत्र येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : बिद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्याबरोबर आमच्या चर्चेच्या दोन फेºया झाल्या आहेत. भाजप आणि आम्ही तत्त्वत: एकत्र येण्याचे ठरले आहे. मात्र, या चर्चेत कागल तालुक्यातील कोणी सामील नव्हते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.बिद्री साखर कारखान्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : बिद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्याबरोबर आमच्या चर्चेच्या दोन फेºया झाल्या आहेत. भाजप आणि आम्ही तत्त्वत: एकत्र येण्याचे ठरले आहे. मात्र, या चर्चेत कागल तालुक्यातील कोणी सामील नव्हते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी येथे बोलविण्यात आला होता. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी कारखाना निवडणुकीबद्दल नेमकी युती कोणाबरोबर? असे प्रश्न उपस्थितीत केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी गणपतराव फराकटे होते. यावेळी संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या संगीता खाडे, प्रवीणसिंह पाटील, भैया माने, दिनकर कोतेकर, सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य मनोज फराकटे, आदी प्रमुख उपस्थित होते.आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले की, बिद्री साखर कारखान्यात के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल पंधरा हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येणार यात शंका नाही. मात्र, भाजपकडून प्रस्ताव आल्याने चर्चेला सुरुवात केली आहे. शेतकºयांच्या हितासाठी कारखान्यात आम्हाला सत्ता हवी आहे. कागल तालुक्यातील उमेदवार निवडीसाठी सुकाणू समिती जाहीर केली आहे. यावेळी प्रवीणसिंह पाटील, प्रवीणसिंह भोसले, भैया माने, सुभाष चौगुले, जगदीश पुजारी, शिवाजी पाटील, रमेश पाटील, अनिल साळोखे यांची भाषणे झाली. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी आभार मानले.प्रवीणसिंह पाटील चिंता करू नका...आ. मुश्रीफ म्हणाले की, ‘बिद्री’बद्दल प्रवीणसिंह पाटील चिंता करू नका. ‘जान जाये पण वचन न जाये,’ असे माझे तत्त्व आहे. ‘गोकुळ’, ‘लोकसभा’, विधान परिषद निवडणुकीत पैरा कसा फेडायचा असतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. तुम्ही बिनधास्त राहा...हसन मुश्रीफ जनतेच्या काळजातील आमदार...आमदार सुरेश हाळवणकर यांनी काही दिवसांपूर्वी माजी आमदार संजय घाटगेंचा उल्लेख जनतेच्या मनातील आमदार असा केला होता. याचा संदर्भ घेऊन जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, कागलच्या जनतेने मनातला आमदार चारवेळा निवडून दिला आहे. हसन मुश्रीफ हे जनतेच्या काळजातील आमदार आहेत.