शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आओ भाषा सीखें...’ छत्रपती शहाजी कॉलेजमध्ये अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:12 IST

मराठी भाषेमध्ये सर्रासपणे इंग्रजी, हिंदी शब्दांचा वापर भरमसाट होत असल्याने, अनेक शब्दांना संबंधित भाषेत काय म्हणतात, असे प्रश्न अनेक वेळा सर्वांनाच पडतात. हीच खंत लक्षात घेऊन छत्रपती शहाजी महाविद्यालयात ‘आओ भाषा सीखें...’ या उपक्रम राबविला जात आहे.  

-प्रदीप शिंदे कोल्हापूर : मराठी भाषेमध्ये सर्रासपणे इंग्रजी, हिंदी शब्दांचा वापर भरमसाट होत असल्याने, अनेक शब्दांना संबंधित भाषेत काय म्हणतात, असे प्रश्न अनेक वेळा सर्वांनाच पडतात. हीच खंत लक्षात घेऊन छत्रपती शहाजी महाविद्यालयात ‘आओ भाषा सीखें...’ या उपक्रम राबविला जात आहे.     मातृभाषेवर प्रभुत्व असलेच पाहिजे, यात दुमत नाही; परंतु जगातील व्यवहाराची प्रमुख भाषा इंग्रजीसह हिंदी भाषाही येणे गरजेचे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात आज झपाट्याने बदल घडून येत आहेत.

मराठी भाषेसोबतच आता हिंदी व इंग्रजी भाषा बोलली जाते.  मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलण्यासह त्यांचे व्याकरणही चांगले पाहिजे. हीच गोष्ट लक्षात घेऊन छत्रपती शहाजी महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. अरुण कांबळे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्यासह पुढाकार घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांना अधिक बळकटी करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.   ‘आओ भाषा सीखें...’ हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून महाविद्यालयात राबविला जात आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील शब्द, म्हणींची ओळख होऊन त्यांच्या व्यवहारज्ञानात व शब्दांत वाढ झाली आहे.एक शब्द तीन भाषांतमहाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ‘आओ भाषा सीखें...’ हा फलक लिहला जातो. दररोज एक शब्द मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीन भाषांमध्ये लिहिला जातो. वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार व ग्रामीण बोलीभाषेतील शब्द येथील फलकावर लिहिला जात असल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचाºयांच्या शब्दज्ञानात वाढ होत आहे.   

मला वेगवेगळ्या भाषांमधील शब्द वाचणे व त्यांचा नेमका अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्याची सवय आहे. त्यातूनच या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही सुरू केला. बोलीभाषेतील शेकडो शब्दांचे अर्थ आजच्या तरुण पिढीला कळावेत, शब्दज्ञान वाढावे हा त्यामागील प्रामाणिक हेतू आहे.        - प्रा. अरुण कांबळे