शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दोन तासांत दहन, रक्षाविसर्जनही..!

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

गॅसदाहिनी : महापालिकेचे प्रदूषणमुक्तीचे नवे पाऊल

तानाजी पोवार / कोल्हापूर कोल्हापूर : मृतदेहाच्या दहनानंतर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन पंचगंगा स्मशानभूमी येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चून मृतदेह दहन करण्यासाठी गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे. मृतदेह दहनानंतर अवघ्या दोन तासांत रक्षाविसर्जनाचा विधीही उरकता येणार आहे. दहन प्रक्रियेवेळी दुर्गंधी, धूर, वायू निर्माण होत नसल्याने हा नवा उत्तम पर्याय पुढे आला आहे. या गॅसदाहिनीसाठी १४व्या वित्त आयोगात खर्चाची तरतूद करण्यात येत आहे. कोल्हापुरात महानगरपालिकेतर्फे तीन ठिकाणी स्मशानभूमीची सोय असून, येथे मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. पंचगंगा स्मशानभूमीत दहन प्रक्रियेसाठी ४२ बेड असून, प्रतिदिन किमान १० ते १२ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार होतात. एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकूड व शेणीचा किमान १२२० रुपये खर्च येतो. सण, अमावस्या, पौर्णिमेवेळी सलग दोन-तीन दिवस रक्षाविसर्जन विधी झाला नाही, तर नवीन मृतदेह दहनासाठी बेड शिल्लक राहत नाहीत, त्यावेळी दोन बेडच्या मध्येच दहन करण्याची वेळ येते. दहनादरम्यान दुर्गंधी, धूर व वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात होते. लाकूड व शेणी मिळण्यातही अडचणी निर्माण होतात. यातून मार्ग काढण्यासाठी गॅसदाहिनीचा प्रयोग पुढे आला आहे. गॅसदाहिनी कमीत-कमी जागेत उभा राहू शकते. यामध्ये दहा तासांत किमान सहा मृतदेहांचे दहन करण्याची क्षमता असून ३६० किलो वजनापर्यंत मृतदेहाचे दहन करता येते. एका मृतदेहाच्या दहनासाठी किमान ७५ ते ९० मिनिटे वेळ लागतो. त्यामुळे दहन केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच रक्षाविसर्जनाचा विधी पार पाडता येतो. या गॅसदाहिनीमुळे प्रदूषणावर पूर्णत: नियंत्रण मिळविता येते. सरणावरील मृतदेह दहनापेक्षा गॅसदाहिनीचा उत्तम पर्याय पुढे आला आहे. प्रदूषण नियंत्रित गॅसदाहिनीमध्ये मृतदेहाचे दहन केल्यानंतर त्यातून कोणतेही प्रदूषण होत नाही. कारण ही गॅसदाहिनी पूर्णत: बंदिस्त असून, मृतदेह दहनावेळी दुर्गंधी, वायू अथवा धूर निर्माण होत नाही. पारंपरिक दहन पद्धतीत एका मृतदेहापासून सुमारे ४० ते ५० किलो रक्षा निर्माण होते; पण गॅसदाहिनीमध्ये अवघी दोन किलोच रक्षा निर्माण होते. याशिवाय लाकूड आणि शेणींची बचत होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवता येते. दहन पद्धतीतील फरक (प्रती मृतदेह) पारंपरिक दहन गॅसदाहिनी दहन वेळ : ८ तास ७५ ते ९० मिनिटे खर्च : १२२० रुपये ७०३ रुपये रक्षा निर्माण : ४० ते ५० किलो २ किलो रक्षाविसर्जन : किमान ३ दिवस दहनानंतर २ तासांनी प्रदूषण : दुर्गंधी, धूर अधिक काहीच नाही मानसिकता हवी कोल्हापुरात स्मशानभूमीत सरणावरच दहन करण्याची प्रथा असल्याने प्रदूषणाला खतपाणी मिळते. यापूर्वी लाखो रुपये खर्चून डिझेल दाहिनीचा पर्याय महापालिकेने पंचगंगा स्मशानभूमीत उभा केला होता; पण त्यामध्ये अवघ्या दोनच मृतदेहांचे तसेच रुग्णालयातील काही सुट्या अवयवांचे व बेवारस मृतदेहांचे दहन केले होते. डिझेल दाहिनीला विरोध झाल्याने ती पूर्णपणे मोडकळीस आली, तर आता गॅसदाहिनीचा पर्याय पुढे आला आहे. त्याचा वापर करण्याची मानसिकता कोल्हापूरकरांनी स्वीकारणे गरजेचे आहे.