शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कलर्स’ प्रस्तुत ‘सखी मंच रिमझिम गाणी झलक सुहानी’

By admin | Updated: July 26, 2016 00:19 IST

गुरुवारी आयोजन : नाट्यसंगीत, नृत्य, मनोरंजनाची मस्तीभरी ‘झलक दिखला जा’

कोल्हापूर : आला पुन्हा नव्यानं ओल्या मातीचा सुगंध, मन झाले एकवार पुन्हा बेहोश, बेधुंद. पहिला पाऊस पडून गेलेला आहे. धरणीमातेने हिरवाकंच शालू पांघरला आहे. ती पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या रोमॅँटिक वातावरणात हळूच सुरेल तान कानांवर पडावी, मन बेभान होऊन नाचू-गाऊ लागावं असं वाटतं असतं. नेमका या वातावरणाचा मूड ओळखून, आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या मनांतील भाव ओळखून पुन्हा एकदा ‘कलर्स’ प्रस्तुत ‘लोकमत सखी मंच’ घेऊन येत आहे, ‘रिमझिम गाणी, झलक सुहानी.’ हा कार्यक्रम गुरुवार, दि. २८ जुलै रोजी दुपारी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ‘लोकमत सखी मंच’ने आपल्या सदस्यांसाठी चौफेर कार्यक्रम देऊन त्यांच्या मनात घर केलं आहे, त्याचप्रमाणे ‘कलर्स’ने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाच्या स्वरूपात पुन्हा एकदा ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’ आपल्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातील गाणी, आपल्या आवडीची पाऊसगाणी आणि सोबतच नृत्याची ‘झलक दिखला जा’ स्पर्धा! कार्यक्रमाआधी नृत्यस्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ‘सखीं’नी कार्यक्रमस्थळी अर्धा तास अगोदरर् नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी केलेल्या ‘सखीं’मधून दहा भाग्यवान सखींची अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे.१० स्पर्धकांना जॅकलीन फर्नांडिसच्या गाण्यांवर नृत्य करून दाखवायचे आहे. त्यामधून परीक्षक निवडतील अंतिम तीन विजेते. या कार्यक्रमासोबतच प्रल्हाद पाटील यांचा धमाल आॅर्केस्ट्रा हिटस् बीटस् गाण्याचा कार्यक्रमही सखींसाठी होणार आहे.‘कलर्स’ चॅनेलवर पुन्हा एकदा ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता ‘झलक दिखला जा हॉट है’ सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची ‘मिस युनिव्हर्स श्रीलंका’ आणि सुप्रसिद्ध मॉडेल जॅकलीन फर्नांडिस सेलिब्रिटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश हेगडे हेसुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहेत. एकूण बारा सेलिब्रिटी या ‘झलक दिखला जा हॉट है’ यामध्ये सहभागी होणार आहेत. यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग शोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान आणि शांतनू महेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलिब्रिटी या शोचे आकर्षण आहे; पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शोला एक ग्लॅमरस आणि सीझनिंग स्वरूप आले आहे, जे या शोचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा पावसाच्या गाण्यांसोबत, कर्णमधुर संगीतासोबत, नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत ‘झलक दिखला जा’चे स्वागत करूया. या कार्यक्रमाचा वेगळा रंग आम्ही घेऊन येत आहोत, ज्यात असणार आहे डान्स, मस्ती, मनोरंजन आणि धमाल.‘कलर्स’ चॅनेलवर पुन्हा एकदा ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता ‘झलक दिखला जा हॉट है’ सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची ‘मिस युनिव्हर्स श्रीलंका’ आणि सुप्रसिद्ध मॉडेल जॅकलीन फर्नांडिस सेलिब्रिटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश हेगडे हेसुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहेत. एकूण बारा सेलिब्रिटी या ‘झलक दिखला जा हॉट है’ यामध्ये सहभागी होणार आहेत. यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग शोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान आणि शांतनू महेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलिब्रिटी या शोचे आकर्षण आहे; पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शोला एक ग्लॅमरस आणि सीझनिंग स्वरूप आले आहे, जे या शोचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा पावसाच्या गाण्यांसोबत, कर्णमधुर संगीतासोबत, नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत ‘झलक दिखला जा’चे स्वागत करूया. या कार्यक्रमाचा वेगळा रंग आम्ही घेऊन येत आहोत, ज्यात असणार आहे डान्स, मस्ती, मनोरंजन आणि धमाल.