शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

बालकांच्या निरागस हास्याची रंगली मैफल

By admin | Updated: July 16, 2015 00:57 IST

‘जॉन्सन्स’ प्रस्तुत ‘लोकमत सुदृढ बालक स्पर्धा’ : ४०० बालकांचा उत्स्फूर्त सहभाग; बालकांच्या संगोपनाविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

कोल्हापूर : विविध रंगांच्या पोशाखात नटून-थटून आलेली बालके, लाडक्या ‘पिल्ल्या’सोबत पालकांनी फोटोसाठी दिलेली पोझ आणि त्यांच्या पाल्याने दिलेले निरागस, अवखळ स्माईल, अशा विविध, आनंददायक क्षणांमुळे स्वर्गातील नंदनवनाचा भास होत होता. निमित्त होते... जॉन्सन्स बेबी प्रायोजित ‘लोकमत’ सुदृढ बालक स्पर्धेचे! कोल्हापुरातील मधुसूदन हॉलमध्ये मंगळवारी दुपारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आयएपी, कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉ. छाया पुरोहित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘आयएपी’च्या सचिव डॉ. दीपा फिरके, डॉ. राहुल शिंदे, डॉ. राजेश औंधकर, जॉन्सन्सचे साउथ महाराष्ट्र व गोव्याचे रिजनल मॅनेजर ज्ञानेश्वर थोरबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण तीन गटांतील ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धा दुपारी दोन वाजता जरी सुरू होणार असली तरी पालकांची दुपारी एक वाजल्यापासूनच गर्दी होत होती. या स्पर्धेमध्ये एकूण ४०० बालकांचा सहभाग होता.हॉलच्या परिसरात रंगीबेरंगी फुगे, डोरेमॉम व छोटा भीमची वेशभूषा परिधान केलेले गंमतवीर बालकांचे स्वागत करीत, आपल्या हावभावांनी त्यांच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलवीत होते. या ठिकाणी प्रथम बालकांच्या वजन व उंचीची नोंद घेऊन, बालकांसोबत पालकांचा विशेष फोटो काढण्याचे खास नियोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले होते. अनेकजण आपल्या लाडक्या ‘पिल्ल्या’सोबत येथे फोटो काढून घेत होते. यासह मुलांना खेळण्यासाठी हॉलबाहेर रिमोट गाडीचे विशेष नियोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लहान मुलांसह त्यांचे पालकही दंगामस्ती करण्यात रमले होते. गुटगुटीत, निरोगी बालकांचे कौतुक आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी आयोजित या स्पर्धेत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदा आठल्ये यांनी केले. प्रत्येक बालकासाठी ‘जॉन्सन्स बेबी’तर्फे हेल्थ किट देण्यात आले. डॉक्टरांनी उपस्थित मातांना शिशूच्या आरोग्यविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. लहान मुलांची त्वचा ही प्रौढ व्यक्तीच्या त्वचेपेक्षा खूप वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी खास पद्धतीने तयार केलेली सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशीच उत्पादने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी यावेळी दिला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. छाया पुरोहित, डॉ. दीपा फिरके, डॉ. पी. जी. पाटील, डॉ. राहुल शिंदे, डॉ. अमोल गिरवालकर, डॉ. साईनाथ पोवार, डॉ. विजय गावडे, डॉ. शिरीष मिरगुडे, डॉ. संतोष निंबाळकर, डॉ. निवेदिता पाटील, डॉ. राजेश औंधकर, डॉ. विमला रानडे, डॉ. ऋषिका यादव, डॉ. नितीन काशेकर, डॉ. सुधीर सरवडे यांनी काम पाहिले. यासाठी सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कॉलेज आॅफ नर्सिंगमधील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी ‘जॉन्सन्स’तर्फे ‘बाळाची निगा’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बाळाच्या आरोग्याला साजेशी अशी शुद्ध, सौम्य, संवेदनशील आणि वैद्यकीय परीक्षणांतून सिद्ध झालेली उत्पादने निर्माण करण्याची उज्ज्वल परंपरा ‘जॉन्सन्स बेबी’ला लाभलेली आहे. कंपनीची सर्व उत्पादने गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता कठोर वैद्यकीय चाचण्यांतून मंजूर केली जातात; म्हणून गेल्या शंभर वर्षांपासून लहान मुलांची काळजी घेण्याबाबत एक विश्वासू नाव म्हणून ‘जॉन्सन्स बेबी’ची ओळख टिकून आहे. सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशा तिहेरी लाभयुक्त उत्पादनांद्वारे ग्राहकांना नेहमी दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण सेवा पुरविण्यासाठी कंपनी नेहमीच तत्पर राहिली आहे. (प्रतिनिधी)