शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची रंगत पोहोचली टिपेला

By admin | Updated: October 28, 2015 00:18 IST

महापालिका निवडणूक : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; शिजतेय महागाईची ‘डाळ’

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार आता खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपांच्या तोफगोळ्यांमुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते घायाळ व्हायला लागले आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचारापासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधील कमिशनपर्यंत, गुंड-मवाली, मटकेवाल्या उमेदवारांपासून राड्यापर्यंत आणि भाजपच्या अकार्यक्षमपणापासून ते तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीपर्यंत सर्व मुद्दे प्रचारसभांतून चर्चेत आले आहेत; परंतु सुरुवातीच्या टप्प्यात दिलेले विकासाचे जाहीरनामे मात्र या आरोपांच्या फैरीमुळे मागे पडायला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने यापूर्वी ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार’ या विषयावर चर्चा करताना महापालिकेतील बरेच घोटाळे प्रचारसभांतून मांडले; परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एका कार्यक्रमात काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील कमिशनचा नवीनच मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा यापूर्वी कधी झाली नव्हती, पण प्रथमच पालकमंत्री पाटील यांनी हा विषय बाहेर काढला. त्यामुळे गडबडलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनुक्रमे सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी चौकशी कराच, असे आव्हान देत कसलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा खुलासा केला. सोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांमध्येत राडा झाल्याने शिवसेनेसह कॉँग्रेस पक्षाला आयतेच कोलित मिळाले. ताराराणी आघाडीचे कारभारी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचे आधीपासून आक्षेप घेतला जात होता, त्याला राड्यामुळे आयतेच बळ मिळाले. दहशत पसरविण्याचा या प्रकाराचा मुद्दा आता शिवसेना आणि काँग्रेसकडून उचलून धरण्यात येत आहे. पुढचे दोन दिवस तरी हा विषय चांगलाच गाजणार आहे.