शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

निपाणी मतदार संघात काँग्रेस-भाजपात टक्कर

By admin | Updated: February 11, 2016 23:44 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक, प्रचाराची रणधुमाळी समाप्त

निपाणी : निपाणी तालुका आणि जिल्हा पंचायतीसाठी १३ रोजी मतदान होत आहे. अर्जदाखल करण्यापासून घरोघरी पदयात्रेने प्रचार यंत्रणा जोरदारपणे राबविण्यात आली. तरी प्रचाराच्या आखेरच्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसच्या मोठ्या सभा झाल्या. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने शेवटच्या टप्प्यातील दोन दिवसांत रणधुमाळी उडाली. या मतदार संघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात टक्कर होणार आहे. निपणी मतदार संघात जिल्हा पंचायतीच्या चार आणि तालुका पंचायतीच्या २१ भागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये निखराची लढाई लागली आहे. गतवेळच्या तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले होते. ही भाजपच्या विजयाची परंपरा यंदा खंडित करण्यासाठी काँग्रेसचे नेते मंडळी रात्रंदिवस झटत आहेत. तर भाजपची विजयाची घौडदौड चालू ठेवण्यासाठी भाजप आमदारांसह नेतेमंडळींनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या विजयांसाठी केंद्रीय रसायनमत्री अनंतकुमार यांनी बेनाडी येथे भव्य सभा घेऊन राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पिंगळे यांनी मतदार संघातील मोठ्या गावांत प्रचार सभा घेतल्या, तर भाजप उमेदवारांच्या विजयासाठी आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार सुभाष जोशी, सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारसभा आणि पदयात्रा काढून चांगले वातावरण निर्माण केले आहे. तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक ही विधान सभा निवडणुकीसाठी महत्त्वाची असल्याने काँग्रेस आणि भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षांतर्फे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले नसले, तरी विकासकामांचा मुद्दा प्राचारात वापरला गेला आहे. निपाणी विधानसभा मतदार संघातील कोगनोळी जिल्हा पंचायत मतदार संघ हा काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तो टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. तर बालेकिल्ल्याला खिंडार पाडून विजयाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. सर्वच मतदार संघात दोन्ही पक्षांनी तुल्यबळ उमेदवार उतरविल्याने निपाणी मतदार संघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचाराने वेग घेतला आहे. शनिवारी (दि. १३) मतदान, तर २३ ला निकाल जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)