शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून कॉलेज युवतीची आत्महत्या ?

By admin | Updated: January 5, 2016 01:13 IST

युवती महूदची : नागाळा पार्क परिसरातील घटना

कोल्हापूर : मैत्रिणींच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या युवतीने वारणा कॉलनी, नागाळा पार्क येथील राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. स्मिता उत्तम खांडेकर (वय १९, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे तिचे नाव आहे. स्मिताने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आत्ताच आम्ही कारण स्पष्ट करू शकत नसल्याचे सांगितले. दरम्यान, स्मिताच्या मैत्रिणी तिची चेष्टामस्करी करीत होत्या. रविवारीही कॉलेजला सुटी असल्याने दिवसभर त्या तिला चिडवत होत्या. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्या कोणत्या विषयावर तिची चेष्टा करीत होत्या, याबाबतचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले, स्मिता हिने दहावीनंतर विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. ती वारणा कॉलनी येथील सचिन पांडुरंग चव्हाण यांच्या ‘लक्ष्मी विरार’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये भाड्याने राहत होती. तिच्या शेजारी तिच्याच गावातील दहा-बारा मुलीही राहत होत्या. सोमवारी सकाळी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने शेजारी राहणाऱ्या मुलींनी तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावून तिला हाक मारली. परंतु आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना शंका आली. घरमालक सचिन चव्हाण यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा मोडून आतमध्ये पाहिले असता तिने सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना कोल्हापूरला बोलावून घेतले. तत्पूर्वी त्यांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींकडे चौकशी केली. तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल कोणाचा होता, याचीदेखील माहिती घेतली. सायंकाळी पाचच्या सुमारास तिचे आई-वडील कोल्हापुरात आले. त्यांनी सीपीआरच्या शवविच्छेदन विभागात मुलीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. त्यानंतर ते मृतदेह घेऊन गावी परतले. तिच्या आई-वडिलांना पोलिसांनी आज, मंगळवारी कोल्हापूरला परत बोलाविले आहे. त्यामुळे या घटनेमागे काहीतरी गंभीर कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी) उपाशीपोटी आत्महत्या स्मिता रविवारी रात्री जेवणाचे ताट घेऊन खोलीमध्ये गेली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. सकाळी खोलीमध्ये ते ताट तसेच होते. त्यावरून तिने जेवणही केले नसल्याचे स्पष्ट झाले.