शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

कॉलेज कॅम्पस् गर्दीने फुलले...

By admin | Updated: June 11, 2014 01:21 IST

बारावी परीक्षेच्या गुणपत्रकांचे वाटप

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रकांचे आज, मंगळवारी शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये वाटप करण्यात आले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी केलेल्या गर्दीने कॉलेज कॅम्पस बहरले होते. उद्या, बुधवारपासून शहरातील विविध महाविद्यालयांत प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठीच्या अर्जांच्या विक्रीचा प्रारंभ होणार आहे.बारावीचा ‘आॅनलाईन’ निकाल २ जूनला जाहीर झाला. या परीक्षेला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून १ लाख १४ हजार ६०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे सकाळी अकरा वाजता वितरण केंद्रांवरून जिल्ह्यातील महाविद्यालयांना गुणपत्रिका देण्यात आल्या. त्यानंतर संबंधित महाविद्यालयात दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या पुढील प्रवेशाबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. काही विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी महाविद्यालयात आले होते. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी २१ जूनपर्यंत शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे अर्ज करता येईल. यासाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकन करता येईल. (प्रतिनिधी)