शिरोळ तालुक्यात ४५ वयोगटावरील १ लाख ५२ हजार ६५ इतके नागरिक आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अशा सर्व नागरिकांना कोविड लस देण्याचे काम सुरू आहे. अद्यापही काही नागरिकांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ४५ वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविड लस देण्याबाबत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आढावा बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी कोविड लस देण्याबाबत जिल्हाधिकारी देसाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन कोविड लसीकरणाची माहिती घेणार आहेत. तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका यांच्यासह कर्मचाऱ्यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहनही तहसीलदार डॉ. मोरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आज शिरोळ दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST