शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यांतील ‘कलेक्टरां’ची होणार उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:11 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाऱ्या शहरातील पाचही पोलीस ठाण्यांतील ‘कलेक्टरां’ची पोलीस ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाऱ्या शहरातील पाचही पोलीस ठाण्यांतील ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात येणार आहे. रविवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संबंधित ‘कलेक्टरां’ची यादी मागवून घेतली. आपले नाव आणि फोन नंबर घेतल्याची माहिती समजताच वसुलीबहाद्दर ‘कलेक्टरां’नी मुख्यालयाकडे धाव घेत कानोसा घेतला.खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डिटेक्शन ब्रँच- डीबी पथक) आहे. या पथकात काम करणारे अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यांची उकल न करता स्वत:चे हित जपत रुबाब मिरविताना दिसतात. जिल्ह्यामध्ये ३२ पोलीस ठाणी आहेत; तर मुख्यालयात स्थानिक गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक, मानवी अत्याचार प्रतिबंधक पथक, आदी शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये दोन-तीन ‘कलेक्टर’ ठरलेले आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळत ते हद्दीतील अवैध व्यावसायिकांकडून ठरलेला हप्ता घेतात. हप्तावसुली जोरात सुरू झाल्याने अवैध व्यवसाय फोफावले आहेत. म्हणूनच तर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करण्याचे धाडस अवैध व्यावसायिकांनी केले. या अवैध व्यावसायिकांच्या मग्रुरीवर नियंत्रण ठेवायचे कोणी? असा प्रश्न कोल्हापूर पोलीस दलात होता.जिल्ह्यात मटका, जुगार, दारू, सेक्स रॅकेट, क्लब यांसारखे अवैध धंदे आणि पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख वादग्रस्त ठरले. त्यांनी अवैध व्यावसायिकांना लक्ष्य केले. त्यांच्याशी संपर्कात असणाºया पोलिसांची यादी मिळवून टेहळणी ठेवली होती. रविवारी डॉ. देशमुख यांनी ‘कलेक्टरां’ची यादी घेतली. त्यांच्या रीडरने दुपारी शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर आणि स्थानिक गुन्हे शाखा येथील ठाणे अंमलदारांना फोन लावून ‘कलेक्टरां’ची नावे आणि फोन नंबर घेतले. या प्रकाराची माहिती समजताच संबंधित ‘कलेक्टरां’नी मुख्यालयाकडे धाव घेत कानोसा घेतला. त्यांना वायरलेसवरून निरोप धाडत ‘आहे त्या स्थितीत पोलीस मुख्यालयात हजर राहण्या’चे आदेश दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात ड्यूटीवर्षभरात पोलीस दलातील डझनभर कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची अशा भ्रष्ट कर्मचाºयांच्या वर्तनामुळे नाचक्की झाली. तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अवैध व्यावसायिकांशी साटेलोटे असणाºया तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी केली होती. त्यांना दिवसभर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात उभे राहण्याची ड्यूटी लावली होती.