शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

जिल्हाधिकारी कार्यालयात मनोरूग्णाचा धुमाकूळ

By admin | Updated: December 13, 2014 00:26 IST

लाखमोलाचे कार्यालय असुरक्षित

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महसूल विभागाचे जिल्ह्याच्या ठिकाणचे महत्त्वाचे कार्यालय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख आहे. सर्वाधिकार असलेले आणि सर्वांना आदेश देणारे हे कार्यालय! रात्रीचा एक पहारेकरी वगळता स्वत:ची अशी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने हे कार्यालय रात्री- अपरात्री बेवारसच असते. या इमारतीत आज, शुक्रवारी सकाळी चक्क एका मनोरुग्णाने धुमाकूळ घातला! बेभान झालेल्या या मनोरुग्णाने एका खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकालाच काठीने दणकले. त्याच्या मर्कटलीलांनी हबकलेल्या कर्मचाऱ्यांनी मग पोलिसांना पाचारण करून त्याला जेरबंद केले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक मनोरुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरला. बघता-बघता तो निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच झाडावर चढला. ठेकेदाराने तेथे एक सुरक्षा रक्षक ठेवला आहे. त्याच्या हे लक्षात येताच त्याने त्या वेड्याला खाली उतरण्यास सांगितले; परंतु तो ऐकेना. मोठ्याने दरडावून पाहिले, हातातील काठीची भीती दाखवली; पण काहीच उपयोग होईना. तथापि, थोड्याच वेळात तो मनोरुग्ण स्वत:हून खाली उतरला आणि त्याने सुरक्षा रक्षकालाच काठीने बदडले. नंतर तेथून तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर गेला. तेथे त्याने आरडाओरड करून दंगा करण्यास सुरुवात केली. हा मनोरुग्ण ‘स्वराज भवन’वर लावलेल्या तिरंगी झेंड्याच्या खांबाकडे गेला. त्याने झेंड्याची दोरीही हातात धरली. झेंड्याची दोरी खेचणार तोच कर्मचाऱ्यांनी त्याला ओरडून बिथरवले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पुढे पुन्हा तो इकडून तिकडे ओरडत पळत सुटला. मनोरुग्णाचा हा धांगडधिंगा पाहून शाहूपुरी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ‘सरकारी प्रसाद’ देताच त्याची मर्कटलीला बंद पडली. पोलीस येईपर्यंत मात्र अर्धा-पाऊण तास एक पहारेकरी व कार्यालयात पोहोचलेल्या काही शिपाई मंडळींची पाचावर धारण बसली. लाखमोलाचे कार्यालय असुरक्षितजिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभाग असून बऱ्याच अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयात अत्यंत महत्त्वाच्या अशा हजारो फाईल्स, कागदपत्रे असतात; परंतु हे लाखमोलाचे कार्यालय सर्व बाजूंनी खुले व असुरक्षित आहे. त्याच्या सुरक्षेची फारशी कोणी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. एकच पहारेकरी असल्याने त्याच्यावर मर्यादा येतात. त्यामुळे झालं ते झालं, भविष्यात तरी खबरदारी घेतली गेली पाहिजे.