शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्हा परिषदेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच महापुराचे पाणी घुसल्यानंतर आता हे ...

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच महापुराचे पाणी घुसल्यानंतर आता हे कार्यालयच शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. २०१९ मध्येही सलग १० दिवस जिल्हा परिषदेतून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे महापुराच्या संकटात जिल्हा परिषद पुन्हा एकदा प्रशासनाचा आधार ठरली आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात आणि शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने साहजिकच पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याचे पाणी शहरात पसरले आहे. जयंती नाल्याची फूग थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली आहे. पाणी जाण्यासाठी वाव नसल्याने पावसाचे पाणीही जागीच साठून राहत आहे. परिणामी शुक्रवारी सकाळी १० नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. सकाळी साडेअकरानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेत हलविण्यास सुरुवात झाली. दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखाराव हे त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेत दाखल झाले.

तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना देत जिल्हा परिषद मुख्यालयातील यंत्रणा सक्रिय केली होती. शुक्रवारी दुपारी दोननंतर पालकमंत्री सतेज पाटील, संध्याकाळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याच ठिकाणी जिल्ह्यातील महापुराच्या आपत्तीचे व्यवस्थापन सुरू होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अन्य कामांपेक्षा आता महापुराच्या संकटावर मात करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, अन्य शासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सक्रिय झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत आल्याने या ठिकाणचा माहोलच बदलून गेला आहे. २०१९ च्या महापुरावेळीही येथूनच व्यवस्थापन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेतच बैठक घेतली होती.

चौकट

जिल्हा परिषदेतही गळती

सध्या जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब फोडून कॉलम उभारण्यात आले आहेत. परिणामी मोठ्या पावसामुळे तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे, तसेच अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्याच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर ओल आली आहे.