शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कसबा सांगाव बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: November 10, 2014 00:42 IST

पोलिसांशी वादावादी : वाहनांच्या काचा फोडल्या

कसबा सांगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोशल मीडियावरील विटंबनेच्या निषेधार्थ आज, रविवारी कसबा सांगावमध्ये आरपीआय (आठवले गट)च्या वतीने पाळलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांशी वादावादी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले.सकाळी सातच्या सुमारास कार्यकर्ते बाजारपेठ चौकात जमू लागले. यामध्ये अल्पवयीन तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यानंतर संपूर्ण गावामधून निषेध फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. बाजारपेठ चौकामध्ये टायर्स मोठ्या प्रमाणात पेटविल्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनधारकांची कोंडी झाली आणि प्रवाशांनाही याचा फटका बसला. यानंतर सकाळी आठच्या सुमारास कागलचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वाक्चौरे घटनास्थळी दाखल झाले आणि कार्यकर्त्यांना टायरी पेटविणे बंद करून शांतता राखण्याचे आवाहन करताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ऊसतोडणी कामगार घेऊन आलेल्या एका ट्रकची काच पोलिसांसमोर फोडली. या प्रकारानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले.दरम्यान, सकाळच्या पहिल्या फेरीसाठी आलेल्या एस. टी. बसच्याही काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या बंदमुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. परिसरातील दूध व्यवसायालाही मोठा फटका बसला. दुपारनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ववत सुरू झाली; पण व्यवहार मात्र दिवसभर बंद होते.महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी संतप्त तरुणांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित कांबळे, बबलू कांबळे, नवनाथ कांबळे, सचिन कांबळे, नागेश कांबळे, सुशांत कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)