शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

सहकाराला उतरती कळा...

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेले महापालिकेचे कोट्यवधी रुपये तसेच बँक अडचणीत आल्याचा मुद्दा

सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी संस्थांना लागलेले अधोगतीचे ग्रहण या वर्षातही कायम राहिले. उतरती कळा सुरू असतानाच अनेक सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी हे वर्ष गाजले. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, निनाईदेवी, यशवंत, तासगाव साखर कारखाना, जिल्हा बँक, मिरज अर्बन बँक अशा अनेक सहकारी संस्थांमधील घडामोडी चर्चेत राहिल्या. तासगाव साखर कारखान्याचा प्रश्न सर्वात जास्त गाजला. या कारखान्याच्या प्रश्नावरून आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील यांच्यात पुन्हा विस्तव पडला. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उमटले. निवडणुकीतही सहकाराचा मुद्दा चर्चेचा ठरला. वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेले महापालिकेचे कोट्यवधी रुपये तसेच बँक अडचणीत आल्याचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत गाजला. त्यामुळे सहकारी संस्थांची अधोगती राजकीय मैदानातील कळीचा मुद्दा बनला होता. या प्रश्नाभोवतीच राजकारणही करण्यात आले. सहकार क्षेत्राची ही अवस्था संपूर्ण जिल्हाभर दिसून आली. बंद पडणारे कारखाने, त्यांचे खासगीकरण आणि या संस्थांमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर्षी गाजली. महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 मधील कलम ८३ नुसार झालेल्या चौकशीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने वर्षाखेरीस राजकीय वर्तुळात खळबळ माजली. दहा वर्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संचालक मंडळांनी केलेला कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. आता याच भ्रष्टाचाराच्या जबाबदारी निश्चितीचे काम सध्या सुरू झाले आहे. आगामी वर्षात आता याच घोटाळ्यावरून राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत. याच वर्षात जिल्ह्यात चार बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या. जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वारेही वाहू लागले आहे. क व ड गटातील निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षात होणाऱ्या मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी वर्षाखेरीस राजकीय मंडळींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. कारखान्याची जागाविक्रीवसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणींमुळे कारखान्याच्या दर्शनी बाजूची जागा विक्रीस काढण्याचा निर्णय या वर्षात झाला. सध्या जागाविक्रीची प्रक्रिया सुरू आहे. कारखान्यासमोरील आर्थिक विघ्न अजूनही कायम आहे. कामगारांची देणी, बँकेचे कर्ज अशा अनेक आर्थिक गोष्टींच्या दुष्टचक्रात हा कारखाना अडकला आहे. गेले वर्षभर कारखानाही अनेक मुद्यांवरून चर्चेत राहिला. एकमेव जिल्हा बँकेचा दिलासा...सहकारी संस्थांच्या पडझडीच्या कालावधित जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय सहकार क्षेत्राच्या पथ्यावर पडला. प्रशासक शैलेश कोथमिरे तसेच येथील कर्मचारी वर्गाने या बँकेला अडचणीतून बाहेर काढले. योग्य नियोजन आणि पारदर्शी कारभार असेल तर सहकारी संस्थाही चांगल्या पद्धतीने चालविल्या जाऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. एकमेव जिल्हा बँकेचा दिलासा...सहकारी संस्थांच्या पडझडीच्या कालावधित जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय सहकार क्षेत्राच्या पथ्यावर पडला. प्रशासक शैलेश कोथमिरे तसेच येथील कर्मचारी वर्गाने या बँकेला अडचणीतून बाहेर काढले. योग्य नियोजन आणि पारदर्शी कारभार असेल तर सहकारी संस्थाही चांगल्या पद्धतीने चालविल्या जाऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.