शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

कोगनोळी तपासणी नाका असून अडचण नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

कोगनोळी : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची शक्यता लक्षात येताच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कर्नाटक शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथे ...

कोगनोळी : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची शक्यता लक्षात येताच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कर्नाटक शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथे पुन्हा एकदा तपासणी नाके सुरू केले. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथक असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाद्वारे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची तपासणी केली जाते. वाहनातील प्रवाशांकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात नाही. यामध्ये मालवाहतूक करणारी वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, दुचाकीस्वार यांना सवलत देण्यात आलेली आहे. कर्नाटक राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनाही कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर पुढील प्रवासास मान्यता दिली जाते. या तपासणी पथकामध्ये पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांच्याकडून कामकाज पाहिले जाते. हे कर्नाटकात प्रवेश करण्याचे मुख्य ठिकाण असल्याने या पथकास वारंवार अधिकाऱ्यांच्या भेटी होत असतात. बेळगावचे जिल्हाधिकारी हरीश कुमार, कोविड नियंत्रण विशेष पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्करराव यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेऊन येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही दिले आहे.