शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी नाट्यगृहाची तिसरी घंटा?

By admin | Updated: September 13, 2015 00:03 IST

लोकप्रतिनिधींकडून घाई : केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात

इंदूमती गणेश / कोल्हापूर नूतनीकरणाच्या कारणात्सव गेले दीड वर्ष बंद असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची तिसरी घंटा महापालिका निवडणुकीच्या आधी वाजणार आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात नाट्यगृहाचे काम झाले आहे, त्याच सभागृहातील नेत्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा सोहळा व्हावा यासाठी महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे विचारणा सुरू केली आहे. शासनाने देऊ केलेल्या १० कोटींच्या निधीत केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. खासबाग मैदानाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे; तर नाट्यगृहाच्या कामावर अखेरचा हात फिरविणे, परिसराची स्वच्छता अशी कामे सुरू आहेत. वातानुकूलन, प्रकाश व ध्वनियंत्रणा बसविण्यात आली असून, तिची चाचणी होणे बाकी आहे. अशा रीतीने नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याचे वेध सगळ्यांना लागले आहेत. खरे तर केशवराव भोसले यांची १२५ वी जयंती आणि १५ आॅगस्ट या दोन तारखांना उद्घाटन करण्याचा मुहूर्त टळला आहे. आता शहरात सगळीकडे महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही दिवसांतच गणेशोत्सव सुरू होत आहे. तो संपल्यानंतर आचासंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी विचारणा सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणात लक्ष घातले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनीही त्यात लक्ष घातले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात चित्रनगरी आणि अंबाबाई मंदिराचा विकास रखडला असला तरी नाट्यगृहाचा विषय मार्गी लागला आहे. आता महापालिकेतील त्यांची सत्ता अबाधित राहणार की सत्तांतर होणार, हे ठरायला दोन महिने बाकी असले तरी आपल्या पक्षाने केलेले काम जनतेसमोर यावे, अशी इच्छा दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचीही इच्छा आहे आणि नगरसेवकांना निवडणूक काळातही प्रचारासाठी त्याचा फायदा होणार आहे.