शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

गृहरक्षक दलाची साप्ताहिक परेड बंद

By admin | Updated: January 23, 2015 23:38 IST

निधीची कमतरता : जिल्हा मुख्यालयांना आदेश; कोल्हापूर जिल्हा समादेशक पदही रिक्त

प्रकाश पाटील -कोपार्डे-पोलिसांना दंगलीच्या अथवा आपत्कालीन परिस्थितीत मदत व्हावी या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी गृहरक्षक दलाची (होमगार्ड) स्थापना केली होती. हे दल संपूर्णपणे मानसेवी असून, यामध्ये समाजातील विविध घटकांतील लोक आपला सहभाग ठेवून शासनाला म्हणण्यापेक्षा पोलीस दलाला मदत करीत होते. यात सण, निवडणुका, पूर, दंगली, यांसह आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करून आपले योगदान देत असत. गृहरक्षक दलाला शिस्त आणि कर्तव्याचे शिक्षण देण्यासाठी आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक कवायत व परेड दिली जात असे. मात्र, अलीकडेच राज्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलाच्या जिल्हा मुख्यालयांना साप्ताहिक परेड बंद करण्याचा आदेश १२ डिसेंबर २०१४ ला आल्यापासून ती बंद करण्यात आली असल्याने गृहरक्षक दलाला मरगळ येणार आहे. मुंबई प्रांत व परिसरात उसळलेल्या जातीय दंगलीनंतर पोलीस दलाला सामाजिक सुरक्षितता व संरक्षण देणे अवघड होऊन बसले. यामुळे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मानसेवी संघटना म्हणून गृहरक्षक दलाची स्थापना केली. अलीकडे शासनाने पोलीस दलात होमगार्ड असणाऱ्या उमेदवाराला पोलीस व संरक्षण दलातील भरतीवेळी आरक्षण दिल्याने व कर्तव्य भत्त्यातही ४०० रुपयांपर्यंत वाढ केल्याने युवकांचा गृहरक्षक दलात भरती होण्याकडे कल वाढला होता. बऱ्याच बेरोजगार युवकांना गृहरक्षक दल हा रोजगारासाठी काडीचा आधार होता. मात्र, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणूक, नवरात्र व ईद सणाचा भत्ताच या होमगार्डस्ना मिळाला नसल्याने आधीच आर्थिक तंगीत असणाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अकराशे होमगार्ड आहेत. यांचा शासनाकडे ५० ते ५५ लाख रुपये कर्तव्य भत्ता थकीत आहे.जिल्हा समादेशक पदच रिक्तकोल्हापूर जिल्ह्यासाठी असणारे गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशकपद गेली दीड वर्षे रिक्त आहे. विलासराव पाटील (कौलवकर) हे नोव्हेंबर २०१३ मध्ये पदमुक्त झाले. त्यानंतर हे पद एक वर्षे रिक्त होते. सध्या या पदाचा प्रभारी पदभार नियंत्रण कक्ष कसबा बावड्याकडे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे अरुण पवार यांच्याकडे दिला गेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक दर्जा असणारे जिल्हा समादेशकपद पोलीस निरीक्षकांकडे दिल्याने या गृहरक्षक दलाबद्दलची शासनाची उदासीनता लक्षात येते.कर्तव्य भत्त्याची बिले लवकरच ट्रेझरीकडे पाठवून गृहरक्षकदलातील कर्मचाऱ्यांना भत्ता देणार आहे. १२ डिसेंबर २०१४ ला महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशकांकडून साप्ताहिक परेड बंदचा आदेश दिला आहे. - एम. जे. शिंदे, वरिष्ठ लिपिक