शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात सराफ बाजार बंद

By admin | Updated: March 2, 2016 23:55 IST

१० कोटींची उलाढाल ठप्प : वाढीव अबकारी कराचा निषेध

कोल्हापूर : सोन्याचे दागिने उत्पादनावर लावलेल्या १ टक्के अबकारी कराच्या निषेधार्थ पुकारलेल्या तीन दिवस देशव्यापी संपाला कोल्हापूर जिल्ह्यातून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. त्यामुळे जिल्ह्यातील सराफ बाजारपेठेत एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यावसायिकांतून सांगण्यात आले. या संपामुळे गुजरी, भेंडे गल्ली, राजारामपुरी परिसरात सराफ व्यावसायिकांत शुकशुकाट पसरला होता. जिल्ह्यातील सुमारे ३५०० सराफ व्यावसायिक संपात सहभागी झाले आहेत.केंद्राच्या अर्थसंकल्पात सोन्याचे दागिने उत्पादनावर १ टक्के अबकारी कर लावला आहे. हा कर अन्यायी असल्याने त्याला विरोध करण्यासाठी आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनच्यावतीने देशव्यापी सराफ व्यावसायिकांना ‘बंद’ची हाक दिली आहे. त्यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जिल्हा सुवर्णकार व्यावसायिकांनी मंगळवारी सायंकाळी अचानक बैठक घेऊन देशव्यापी संपास पाठिंबा देण्यासाठी बुधवारपासून तीन दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपली दुकाने न उघडता ‘बंद’मध्ये सहभाग घेतला. सराफ व्यावसायिकांवर व्हॅट, आयकर, गुमास्ता कर, घरफाळा कर, आदी विविध कर लादल्याने हा व्यवसाय यापूर्वीच अडचणीत आहे. त्यात आता या अर्थसंकल्पात नव्याने जादा एक टक्का अबकारी कर लावल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होणार आहे.