शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सराफ व्यावसायिकांचा बंद

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

पॅन कार्ड सक्तीला विरोध : सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प

कोल्हापूर : दोन लाख रुपयांवरील सोने-चांदीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने पॅन कार्डाची सक्ती तसेच अन्य काही जाचक नियम केले आहेत. त्याच्या विरोधात बुधवारी कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी ‘बंद’ पाळला. यामुळे सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात आला. या ‘बंद’बाबत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने दोन लाख रुपयांवरील सोने-चांदीच्या खरेदीसाठी पॅन कार्ड तसेच अर्ज क्रमांक ६० आणि ६१ भरून घेणे सक्तीचे केले आहे. शिवाय सहा वर्षे अशी कागदपत्रे सांभाळूनही ठेवावी लागणार आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी हे पाऊल सरकारने उचलले असले तरी, त्याचे तोटे अधिक आहेत. पॅन कार्ड नसलेल्या ग्राहकांना दोन लाखांवर सोने खरेदी करता येणार नाही. सराफ व्यवसाय कोलमडून पडणार आहे. त्यातून सराफ व्यवसायातील कारागीर, कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. हे टाळण्यासाठी या जाचक नियमांविरोधात सराफ बाजार बुधवारी बंद ठेवण्यात आला. शहरात सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून गुजरीत निदर्शने केली. शिवाय निषेधफेरी काढली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करण्यात आली. यात बाबा महाडिक, राजेश राठोड, कुलदीप गायकवाड, किरण गांधी, धर्मपाल जिरगे, विजयकुमार भोसले, संजय पाटील, कुमार दळवी, हिम्मत ओसवाल, दिनकर लाळगे, मनोज राठोड, नागेश मंत्री, आदी सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते. दरम्यान, या ‘बंद’मुळे सराफ बाजारात शुकशुकाट पसरला होता. (प्रतिनिधी)केंद्र सरकारने केलेल्या पॅन कार्ड सक्तीचा विरोध म्हणून आम्ही व्यावसायिकांनी बुधवारी दुकाने बंद करून शासनाचा निषेध केला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्थानिक संघटनांनी निदर्शने करून केंद्र शासनाचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन दिले. - सुरेश गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघपॅन कार्डाच्या सक्तीमुळे दि. १ जानेवारी २०१६ पासून ३० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच बुधवारच्या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील एकूण सराफ व्यवसायातील साधारणत: दहा कोटींच्या उलाढाली ठप्प झाल्या. पॅन कार्ड सक्तीसह अन्य जाचक अटी रद्द कराव्यात, ही व्यावसायिकांची मागणी आहे. ती मान्य होईपर्यंत शांततेच्या मार्गाने आमचा लढा सुरू राहील.- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ