शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास मतदारसंघांतून ‘घड्याळ’ गायब होणार--

By admin | Updated: January 22, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद निवडणूक रणांगण--आघाडीच्या राजकारणाचा फटका--वीस ठिकाणी एकच इच्छुक--नेत्यांची सोय, पक्षाची गैरसोय

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळापेक्षा बहुतांश तालुक्यांत आघाडीच करण्याचा निर्णय घेतल्याने किमान ५० जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह गायब होणार आहे. आघाड्यांमुळे नेत्यांची सोय होणार असली तरी यात पक्षाचे मात्र नुकसान होणार आहे. निवडणुकीआधी तीन-चार महिने नेत्यांनी स्वबळाच्या कितीही डरकाळ्या फोडल्या तरी निवडणुकीच्या मैदानात खरे ‘बळ’ दिसत आहे. प्रत्यक्ष लढायचे झाल्यानंतर कागल, राधानगरी, भुदरगड वगळता नऊ तालुक्यांत दुसऱ्या पक्षाचा आधार घेतल्याशिवाय लढता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाहूवाडीत शिवसेनेशी, गगनबावड्यात कॉँग्रेससोबत, पन्हाळ्यात जनसुराज्य वगळून सगळ्यांशी, करवीरमध्ये शिवसेनेशी, हातकणंगलेत आवाडे गट व स्वाभिमानी सोडून, शिरोळमध्ये कॉँग्रेससोबत, गडहिंग्लज-चंदगडमध्ये भाजप, तर आजऱ्यामध्ये कॉँग्रेसशी आघाडी होणार, हे जवळपास निश्चित आहे. आघाडीच्या तडजोडीत जेवढ्या जागा पदरात पडणार तिथे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करता आले असते; पण पक्षाच्या निरीक्षकांनीच आघाड्या केल्या तर ‘घड्याळ’ चिन्ह वापरता येणार नसल्याचा फतवा काढल्याने या नेत्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत जिल्हा परिषदेचे १४ मतदारसंघ येतात. येथेच पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे राहणार आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी तीन-चार उभे राहिले, तर १७ ते १८ पेक्षा अधिक ठिंकाणी पक्षाचे चिन्ह दिसणार नाही. त्यात पक्षाकडे मागणी केलेल्या इच्छुकांची संख्या पाहिली तर तब्बल २० जिल्हा परिषद मतदारसंघांत केवळ एक-एकच इच्छुक आहेत. सात ठिकाणी दोघा-दोघांनी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)एकच इच्छुक असलेले मतदारसंघचिखली - अर्चना विकास पाटील, गडमुडशिंगी - अश्विनी राजेंद्र वळिवडे, उजळाईवाडी - अरुणिमा सुनील माने, पाचगाव- सुरेखा शंकर सातपुते, सांगरूळ - अशोक घाडगे, तिसंगी - दिलीप पाटील, असळज- प्रकाश पाटील, कौलव- संजय कलिकते, राधानगरी- सविता राजाराम भाटले, कडगाव- सुनीता धनाजीराव देसाई, उत्तूर - वसंतराव धुरे, आजरा- जयवंत शिंपी, नेसरी - दीपक जाधव, तुर्केवाडी- रामराव गुडाजी, शित्तूर तर्फ वारुण- रणवीर गायकवाड, पिशवी- विजय बोरगे, रुकडी- वेदांतिका धैर्यशील माने, दानोळी- बेबीताई रावसाहेब भिलवडे, अब्दुललाट - मिथुन कोळी, यवलूज- सुप्रिया महेश पाटील. सिद्धनेर्ली, बड्याचीवाडीत मांदियाळी!कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली व गडहिंग्लजमधील बड्याचीवाडीतून प्रत्येकी आठजणांनी मागणी केली आहे. करवीरमधील परितेमधून तब्बल सहाजणांची मागणी आहे.