शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोणतीही साधने न वापरता ‘लिंगाणा’वर चढाई - : अवघ्या सोळा मिनिटे चाळीस सेकंदांत मोहीम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:07 IST

‘लिंगाणा’ सह्याद्री पर्वतामधील एक अजस्र सुळका. किल्ले रायगडजवळ असणाऱ्या या सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याचा प्रयत्न अनेक गिर्यारोहक करीत असतात. त्यासाठी विविध साधनांचा वापर हे धाडसी लोक करतात;

ठळक मुद्देकरनूर गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सागर हा मुंबईतील एका कंपनीत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतो.कोणतेही साधन न घेता तब्बल दोन हजार ९६९ फूट उंची असलेला हा लिंगाणा सर करण्याची कामगिरी

जहाँगीर शेख ।कागल : ‘लिंगाणा’ सह्याद्री पर्वतामधील एक अजस्र सुळका. किल्ले रायगडजवळ असणाऱ्या या सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याचा प्रयत्न अनेक गिर्यारोहक करीत असतात. त्यासाठी विविध साधनांचा वापर हे धाडसी लोक करतात; पण कोणतेही साधन न घेता तब्बल दोन हजार ९६९ फूट उंची असलेला हा लिंगाणा सर करण्याची कामगिरी बजावली आहे कागल तालुक्यातील करनूर येथील सागर विजय नलवडे या युवकाने.

चार मैलांचे चढण अवघ्या सोळा मिनिटे चाळीस सेकंदांत पूर्ण केले आणि परत यशस्वीरीत्या कोणतेही साधन न वापरता खाली उतरण्याची ही देदीप्यमान कामगिरी त्याने केली आहे. त्याच्या या मोहिमेचे आयोजन ‘बा रायगड परिवार’ या दुर्ग भ्रमंती व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थेने केले होते. २१ मार्च रोजी झालेल्या या मोहिमेची दखल देशभरातील दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहण क्षेत्राने घेतली आहे.

बा  रायगड परिवारातील सदस्यांनी आपत्कालीन यंत्रणाही पायथ्याशी सज्ज ठेवली होती. या संपूर्ण मोहिमेचे चित्रीकरण ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सोशल मीडियात तसेच काही न्यूज आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् चॅनेलवर या क्लीप वेगाने व्हायरल झाल्या आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या युवकाच्या कामगिरीचे एकच कौतुक होत आहे.कोण आहे सागर नलवडे : करनूर गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सागर हा मुंबईतील एका कंपनीत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचा फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनिअरिंग हा डिप्लोमा झाला आहे. आई शोभाताई आणि भाऊ चंद्रकांत गावी राहतात. वडिलांचे २००७ मध्ये निधन झाले आहे. पत्नी तेजस्वीसह तो मुंबईत राहतो. ‘बा रायगड’ या संस्थेच्या माध्यमातून तो अशा साहसी मोहिमांचे आयोजन करतो.पुढचे ध्येय माउंट एल्जबुल शिखर‘लोकमत’शी बोलताना सागर म्हणाला की, कोणत्याही साधनाचा आधार न घेता अशी चढाई करणे हा गिर्यारोहणातील महत्त्वाचा आणि खूप अनुभवानंतर, सरावानंतर आत्मसात होणारा प्रकार आहे. दुर्गभ्रमंती मोहिमेतून आपणास ही प्रेरणा लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून मी ही चढाई पूर्ण केली आहे. जगातील सात अवघड असे सुळके आहेत. त्यामधील रशियातील माउंट एल्जबुल शिखर एक आहे. ते या पद्धतीने सर करण्याचा माझा पुढील निर्धार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे.काय आहे हा लिंगाणा सुळका !१६५६ ला छ. शिवरायांनी जावळी जिंकली. तेव्हा हा लिंगाणाही ताब्यात आला. ‘रायगड राजगृह, तर लिंगाणा कारागृह’ अशी म्हण पडली. इतका अवघड असा हा सुळका. एकदा कैद्याला येथे पोहोचविले की तो पळून जाण्याचे धाडस करणार नाही, अशी याची रचना आहे. मध्यावर दोन गुहा तसेच थोडी मोकळी जागा आहे, तर टोकावर वीस फूट रुंद, पंचवीस फूट लांब अशी जागा आहे. शिवलिंगासारखा आकार असल्याने याचे नाव लिंगाणा असे पडले. आजूबाजूस रायगड, राजगड, तोरणा हे किल्ले आहेत.

टॅग्स :Fortगड