शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चाफोडी शाळेमागे उंच कडा, पुढे दरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : चाफोडी (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमागे उंच कडा असून, त्यावर मोठ मोठी झाडे वाढलेली आहेत. इमारतीपासून दोन ते चार फूट अंतरावर असलेल्या या दरडावरील दगड व झाडे केव्हाही ढासळतात. शाळेच्या मैदानापुढे २५ फूट खोल दरी आहे. शाळेची भौगोलिक रचनाच अडचणीची असल्याने विद्यार्थी भीतीच्या छायेत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : चाफोडी (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमागे उंच कडा असून, त्यावर मोठ मोठी झाडे वाढलेली आहेत. इमारतीपासून दोन ते चार फूट अंतरावर असलेल्या या दरडावरील दगड व झाडे केव्हाही ढासळतात. शाळेच्या मैदानापुढे २५ फूट खोल दरी आहे. शाळेची भौगोलिक रचनाच अडचणीची असल्याने विद्यार्थी भीतीच्या छायेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून शाळेच्या सभोवती सुव्यवस्थित संरक्षण कठडा बांधून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.चाफोडीच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. येथे आठ शिक्षक कार्यरत असून, १४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजी व मराठी माध्यमासहीत संगणकाचे विशेष शिक्षणही येथे दिले जाते. येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वर्षानुवर्षे चांगली आहे. सातेरीच्या डोंगर कपारित वसलेल्या चाफोडीच्या प्राथमिक शाळेची इमारत गावाच्यावर डोंगरात व अडचणीच्या ठिकाणी आहे. शाळेच्या पाच खोल्यांचे बांधकाम जीर्ण झाले आहे. पाठीमागच्या बाजूने वाढलेली लहान, मोठी झाडे शाळेवर कोसळण्याची भीती आहे. शेजारील शेतकºयांनी काही ठिकाणी अतिक्रमण केल्याने खेळाचे मैदान शेतवडीत ढासळत आहे. शाळेसमोरील रस्ता मैदानापासून २० ते २५ फूट खोल असल्याने शाळेच्यासभोवती संरक्षण कठडा बांधावा, अशी मागणी होत आहे. संरक्षण कठड्याच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या जिवास धोका होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे याविषयी वेळोवेळी मागणी केली आहे. तरीदेखील शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.