शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:49 IST

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.राष्ट्रपिता ...

ठळक मुद्देकचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्याराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोहिम देशभर स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबद्दल समाधानमोहिमेत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी सक्रीय

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्यावतीने आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून कित्येक टन कचऱ्याची निर्गती करण्यात आली.

कोल्हापूरात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छता मोहिम राबवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, डॉ. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे प्रमुख राहुल चिकोडे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारताचा संकल्प करुन संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानास देशवासियांचा उर्स्फुत प्रतिसाद लाभला असून, आज स्वच्छतेची ही व्यापक लोकचळवळ निर्माण झाली आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने देशभर आज स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छतेची संपूर्ण राज्यात लोकचळवळ बनली असून, या स्वच्छता अभियानात यापुढील काळातही सातत्य ठेवून, स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास सर्वांनी सक्रीय व्हावे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरही स्वच्छतेमध्ये सर्वांनी पुढाकार घेवून स्वच्छतेची दीर्घकालीन मोहिम हाती घ्यावी.