शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

स्वच्छता अभियानामुळे ‘झाडू’लाही अच्छे दिन !

By admin | Updated: November 17, 2014 00:27 IST

विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ : दर दिवशी कोल्हापुरात सुमारे ३० ते ४० हजार रुपयांची विक्री

संतोष मिठारी -कोल्हापूर --विविध शासकीय कार्यालये, शाळा, खासगी कंपनी, स्वयंसेवी संस्था या मोहीम, सप्ताहाचे नियोजन करून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवित आहेत. या अभियानाने विविध कार्यालये, शाळांचा परिसर, रस्ते एकीकडे चकाचक होत आहेत, तर दुसरीकडे झाडूच्या (खराटा) बाजारपेठेला तेजी आली आहे. अभियानामुळे गेल्या दीड महिन्यांपासून कोल्हापुरातील खराट्यांची विक्री सरासरी दहा टक्क्यांनी वाढली आहे.दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर ‘आप’मुळे झाडू अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर आता पुन्हा शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातात झाडू दिसत आहे. निमित्त ठरत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘स्वच्छ भारत’ अभियानाची हाक. या अभियानात शासकीय व खासगी कार्यालये, कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था मोहीम, सप्ताह आयोजित करून आपापली कार्यालये, शाळा, संस्थांचा परिसर, रस्ते चकाचक करत आहेत. आरोग्य राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचा चांगला परिणाम होत आहे. त्याबरोबरच या अभियानामुळे झाडूंची विक्रीदेखील वाढली आहे. गेल्या दीड महिन्यापासून दिवसाकाठी सरासरी दहा टक्क्यांनी विक्रीत भर पडली आहे. अभियान राबविण्यासाठी संबंधितांकडून कमीत कमी २५ आणि जास्तीत जास्त ४० नगांपर्यंत झाडूं (खराटा) ची खरेदी केली जात आहे. दर दिवशी कोल्हापुरात सुमारे ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत झाडूंची विक्री होत आहे. अभियानामुळे साफसफाईबरोबरच झाडू विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. (प्रतिनिधी)कोल्हापुरात बांधणी !तमिळनाडू आणि कर्नाटकमधून खराट्याच्या काड्यांची कोल्हापूरमध्ये आवक होते. याठिकाणी उत्तरप्रदेशमधून आलेले काही लोक त्यांची बांधणी करून शहरासह जिल्ह्यांतील घाऊक विक्रेत्यांना देतात. शहरात अशा पद्धतीने खराट्यांची विक्री करणारे आठ ते दहा घाऊक विक्रेते आहेत. त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करून ग्राहकांना ते आपल्या माध्यमातून देतात.१५ ते १४० रुपयांपर्यंत किमतीबांधणी आणि वजनावर खराट्याची किंमत ठरते. सध्या एक बांधणीचा खराटा १५ रुपये, त्यात जादा काड्या असलेला खराटा १७ रुपयांना मिळतो. दोन बांधणीचा २२, तर लोखंडी पट्टी असणारा खराटा २७, ३२ आणि ३८ रुपयांना मिळतो. काठी बांधलेल्या मोठ्या खराट्याची किंमत १३० ते १४० रुपयांपर्यंत आहे.