शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

हरियाली घोटाळ्यातील दोषींना ‘क्लीन चिट?’

By admin | Updated: March 8, 2016 00:47 IST

‘जिल्हा ग्रामीण’कडून अभय : पाच महिन्यांपूर्वी नोटीस; कारवाई नाही, वाचविण्यासाठी धडपड

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पाणलोट विकास योजनेतील हरियाली कामातील घोटाळ्यातील दोषींना नोटीस देऊन तीन महिने उलटले तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. दोषींना ‘क्लीन चिट’ देण्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील अधिकाऱ्यांचा ‘इंटरेस्ट’ अधिक दिसत आहे. त्यामुळे हरियाला घोटाळ्यातील सर्व दोषींवर कारवाई होणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत विभागाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणातील सहा दोषी ग्रामसेवकांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दिला आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रशासनाने आपल्या विभागासह सामाजिक वनीकरण, कृषी विभाग यातील सहा जणांना ‘कारणे दाखवा नोटीस’ नोव्हेंबर २०१५ मध्ये दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पाणलोट विकास योजनेंतर्गत हरियाली कार्यक्रम सन २००७ ते २०११ या कालावधीत राबविण्यात आला. वनक्षेत्र अधिक असल्यामुळे पन्हाळा तालुक्याची या योजनेसाठी निवड केली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने हरियालीअंतर्गत विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, आराखडा तयार करणे हे काम ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण, कृषी विभाग यांच्याकडून करून घेतले. वाघुर्डे, पणोरे, वेतवडे, वेलवडे, गोगवे, आकुर्डे, सुळे, कांदवडे, पणोरे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, आदी गावांत ही योजना राबविली.वनीकरण वाढविणे, गांडूळ खत तयार करणे, रोपनिर्मिती करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे, डोंगराळ जमिनीवर उपचार करणे, आदी कामांसाठी योजनेतून पावणेदोन कोटी मंजूर झाले. मात्र, प्रत्यक्षात कामात अनियमितता आहे. रोपे चोरी आणि जळाली आहेत. जमिनीत पैसे मुरविल्याचे दाखवून ढपला केला. त्यामुळे शासनाचा उद्देश सफल झाला नाही. हरियाली घोटाळ््यासंबंधी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणा हडबडून जागी झाली. दोषी मोकाटच : १३ ग्रामसेवकांवर ठपका सुरुवातीला १३ ग्रामसेवकांवर ठपका ठेवला. त्यानंतर सहाच ग्रामसेवक दोषी असल्याचे समोर आले; परंतु, अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका असलेले ग्रामीण विकास यंत्रणेतील दोषी अद्याप मोकाटच आहेत.‘कारणे दाखवा नोटीस’ प्रसारमाध्यमांपर्यंत जाऊ नये, याची विशेष दक्षताही विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी घेतली त्यामुळे संशय निर्माण झाला आहे.नोटीस दिलेल्यांचे खुलासे आले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे अजून फाईल गेलेली नाही. अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. - डॉ. हरिष जगताप, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा