शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंदारेंच्या मुत्सद्देगिरीने विरोधक ‘क्लीन बोल्ड’

By admin | Updated: March 26, 2015 00:01 IST

गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँक विश्लेषण : भविष्यात चुका सुधारत कामकाज करावे लागणार

राजाराम लोंढे - कोल्हापूर  गेली दोन वर्षे केलेली निवडणुकीची तयारी, पॅनेल बांधणीत रवींद्र पंदारे यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व विरोधकांचा हट्ट या सर्वांमुळे राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेत विरोधकांना ‘क्लीन बोल्ड’ करण्यात सत्तारूढ गट यशस्वी झाला. पण विरोधकांच्या मतांची विभागणी होऊन त्यांनी दिलेली झुंज सत्तारूढ गटाला आत्मचिंतन करायला लावणारी असून पुढे पाच वर्षांतील चुका सुधारत कामकाज करावे लागणार आहे. सात जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेची निवडणूक नेहमीच अटीतटीची होते. गेल्यावेळेला सभासदांनी तिन्ही पॅनेलला संमिश्र पाठबळ दिले होते. निवडणुकीनंतर विरोधकांनी एकत्रित येत मोट बांधून पाच वर्षे सत्तारूढ गटाला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बँकेची निवडणूक राजन देसाई, बाळासाहेब घुणकीकर व विश्वास माने यांनी एकत्र येऊन लढविण्याचा निर्णयही झाला होता. हे तिन्ही नेते एकसंधपणे निवडणुकीला सामोरे गेले असते तर काही जागांचा निकाल वेगळा दिसला असता, पण दोन-तीन वर्षे एकत्रीकरणाचे सुरू असलेले गुऱ्हाळ ऐन निवडणुकीच्या तोंडावर थंडावले. नवीन व जुन्यांना किती संधी द्यायची; यावरून माने व देसाई यांचे फिसकटले. शेवटपर्यंत प्रयत्न झाले तरी युती होत नाही म्हटल्यावर विश्वास माने यांनी घाईगडबडीने पॅनेलची घोषणा केली. त्यामुळे माने यांना सर्व विभागांना सामावून घेता आले नाही. परिणामी, त्यांचे बहुतांशी उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. राजन देसाई, राजेंद्र पाटील व बाळासाहेब घुणकीकर यांनी ताकदीने प्रचार यंत्रणा राबविली. सत्ताधाऱ्यांचे कच्चे दुवे शोधून त्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. घुणकीकर व राजन देसाई यांनी निकराची झुंज दिली. पण रवींद्र पंदारे यांनी विरोधक एकवटणार हे लक्षात घेऊनच निवडणुकीची बांधणी सुरू केली होती. पॅनेलमध्ये सर्वच विभागांना संधी देत असताना त्याच ताकदीचे उमेदवार सभासदांसमोर आणले. माघारीची वाट न पाहता पॅनेल ठरवून प्रचाराला सर्वप्रथम सुरुवात केल्याने ते जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचू शकले. परजिल्ह्यांतील सभासदांपर्यंत पोहोचणे व त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी ज्या खुबी वापरल्या त्या निश्चितच विरोधकांना विचार करायला लावणाऱ्या होत्या. एकंदरीत पंदारे यांनी केलेली बांधणी, विरोधकांचा जागावाटपातील हट्ट सत्तारूढ गटाच्या पथ्यावर पडला असून रवींद्र पंदारे यांनी पॅनेल बांधणीसह एकूणच प्रचारयंत्रणेत दाखविलेल्या मुत्सद्देगिरीने विरोधक मात्र ‘क्लीन बोल्ड’ झाले हे नक्की.