शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत दर्जेदार नाट्याविष्कार

By admin | Updated: February 17, 2016 00:46 IST

रसिकांचा मोठा प्रतिसाद : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह कोकणातील संघाकडून सादरीकरण

इचलकरंजी : येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई, पुणे, सांगली व कोकण भागातील संघांनी वेगवेगळ्या आशयाच्या एकांकिका सादर केल्या. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लबच्यावतीने या स्पर्धा सुरू आहेत. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धा पाहण्यासाठी रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.पहिल्या सत्रात अवनि थिएटर्स मिरज या संघाने ‘मैत्रिण’ ही संदीप सुर्वे लिखित व अमोल भोजणे दिग्दर्शित एकांकिका सादर केली. एक विवाहित लेखक एका मुलीशी आॅनलाईन मैत्री करतो; पण ते त्याचे दिवास्वप्न असते, असा त्या एकांकिकेचा आशय होता. त्यानंतर रंगवलय फौंडेशन मुंबई निर्मित ‘गांधीला बॉडी पाहिजे, देता का?’ ही एकांकिका रसिकांना प्रभावित केली. समर्थ कलाविष्कार देवगड या संघाने ‘दहा वाजून दहा मिनिटे’ ही एकांकिका सादर केली. व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडियाचे दुष्परिणाम या एकांकिकेतून परिणामकारकपणे समोर आले. कराडच्या मनोरंजन संस्थेने ‘तुका म्हणे अवघे सोंग’ ही एकांकिका सादर केली. सांगलीच्या भगवती क्रिएशन संस्थेने ‘अजूनही चांदरात आहे’ ही एक गंभीर विषयावरील एकांकिका सादर करून रसिकांची मने जिंकली. कॉर्पोरेट जगतात काम करणारे जोडपे, उपभोगवादी जीवनशैलीमुळे बॉससमोर त्या जोडप्याची असहायता; पण शेवटी त्यांनी दिलेला नकार अशी ही एकांकिका होती. त्यानंतर आमचे आम्ही, पुणे संघाने ‘लेखकाचा कुत्रा’ ही एकांकिका सादर केली. एक प्रतिभावंत नाटककार दूरदर्शनच्या मालिका लेखनाकडे वळतो. त्यामुळे उत्तम नाटके लिहिण्याचे बंद करतो; पण त्याच्या शिष्याला हे बरे वाटत नाही आणि तो नाटककारांशी बोलून त्याचे मन वळवतो. कोल्हापूरच्या विजयश्री संस्थेने सुहास भोळे लिखित व विजय कुलकर्णी दिग्दर्शित ‘वात्सल्य’ ही भावस्पर्शी एकांकिका सादर केली. मतिमंद मुलाचा सांभाळ करताना आईची होणारी तगमग या एकांकिकेत दाखविली आहे. आशिष पाथरे यांनी लिहिलेली ‘लव्ह’ ही धमाल एकांकिका सादर करून सिद्धांत थिएटर्स कुडाळच्या संघाने रसिकांची दाद मिळवली. ‘अंतरंग’ ही एकांकिका पुण्याच्या भरत नाट्य संशोधन संस्थेने सादर केली. एक आईच आपल्या मुलीशी नेहमी स्पर्धा करते व यश मिळवते; पण अंतरंगातून त्या मुलीची काळजीही करते, अशा प्रकारची ही एकांकिका आहे. (वार्ताहर)