शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दहावी सीबीएसईत लख्ख यश

By admin | Updated: May 29, 2016 01:09 IST

कोल्हापूरने परंपरा राखली : निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष; नेट कॅफेवर उसळली गर्दी

कोल्हापूर : दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत कोल्हापुरातील सर्व शाळांनी लखलखीत यश मिळविले. या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. शनिवारी दुपारी हा निकाल आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापुरात कोल्हापूर पब्लिक स्कूल, शांतिनिकेतन, चाटे, पोदार आणि विबग्योर या शाळा सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार चालतात. या शाळांमधून एकूण २९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. त्यातील ५८ विद्यार्थ्यांना दहा सीजीपीए हा गुणवत्तेचा शेरा मिळाला. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या शुधाबो नंदी हा विद्यार्थी ५०० पैकी ४९७ गुण मिळवून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आला. या शाळेतील विद्यार्थी मागील कांही वर्षापासून सातत्याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत चमकत आहेत. शाळानिहाय निकालाची माहिती अशी : शांतिनिकेतन : १२६ (१७ जणांना सीजीपीए), कोल्हापूर पब्लिक स्कूल : एकूण विद्यार्थी ८५ (१९ सीजीपीए) विबग्योर स्कूल : ४४ (९ जणांना सीजीपीए), चाटे : ४३ (१३ जणांना सीजीपीए). कोल्हापूरसह महाराष्ट्र विभाग या बोर्डाच्या चेन्नई केंद्रांतर्गत येतो. सीबीएसई बोर्डाने हा निकाल दुपारी दोन वाजता जाहीर होणार म्हणून सांगितले होते; परंतु बोर्डाच्या वेबसाईटला तांत्रिक बिघाड आल्याने दुपारी साडेचार वाजेपर्यंत निकाल मिळू शकला नाही. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनाही मनस्ताप झाला. सगळ्या देशभरातच मुख्य सर्व्हरला ही समस्या निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.विद्यार्थ्यांना निकालाची प्रत नंतर मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी नेटकॅफेसह शाळांमध्येही गर्दी उसळली. चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सायंकाळनंतर यशाचा आनंद पेढे वाटून व जल्लोष करून साजरा केला.